धक्कादायक.. 25 वर्षीय महिलेची दोन चिमुकल्यांसह हत्या,मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत..
घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या दोन चिमुकल्यांसह निर्घृण पद्धतीने मारण्यात आलंय.मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील रांजणगाव येथे घडली आहे. येथे एका 25 वर्षीय महिलेची दोन चिमुकल्यांसह हत्या करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे
पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेहांची पाहणी केली आहे. डोक्यात गंभीर जखमा करून हा खून करण्यात आलाय.तसेच मृतदेहावर पेट्रोल टाकून तो पेटवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. पण पाऊस असल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला आहे.मृतदेह अर्धवट जळाल्यामुळे हत्या झालेली महिला नेमकी कोण आहे, हे शोधण्याचे तसेच मारेकऱ्याला शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.यामुळे पोलिसांनी तपासाची गती वाढविली आहे.
No comments:
Post a Comment