अॅड. रणजित राजदत्त उबाळे यांचीबारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 24, 2025

अॅड. रणजित राजदत्त उबाळे यांचीबारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक..

अॅड. रणजित राजदत्त उबाळे यांची
बारामती तालुका विधीसेवा समितीवर पॅनल विधिज्ञ म्हणून नेमणूक..
बारामती:- बारामती तालुका विद्यीज्ञ समितीवरील मिळालेल्या जबाबदारीमुळे जनता न्यायालयाव्दारे (लोकअदालती) खटले निकाली काढून पिडीत व्यक्तींना जलद आणि कमी खर्चात न्याय मिळवूण देणे, लोकांमध्ये कायदेशीर जागृकता निर्माण करणे, पात्र व्यक्तींना मोफत कायदेशीर मदत व सल्ला देणे, असे या जबाबदारीचा समाजहितासाठी उपयोग करणार असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या समितीची निवड जिल्हा विधीसेवा प्राधीकरण सचिव यांनी त्यांची निवड केलेली असून या समितीवरती एकूण २१ वकीलांची निवड झाली असून त्यातील गरजू व पिडीतांसाठी झटणारे अॅड रणजित राजदत्त उबाळे हे एक तरूण वकील आहेत. गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे दिवंगत पंचायत समिती सदस्य व लोकनेते राजदत्त (आबासाहेब) उबाळे यांचे ते सुपूत्र असून त्यांना गोरगरीबांची सेवा करण्याचे बाळकडू उबाळे परिवाराकडूनच मिळाले आहे. हे व्रत मी पुढे असेच चालु ठेवणार आहे असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment