तिहेरी हत्याकांड केस मधील आरोपी यांना आजन्म(जन्मठेप) करावासाची शिक्षा..
दौड:- पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात. चालू असलेल्या सेशन केस क्र २५२/२०२२ महाराष्ट्र सरकार वि संजय बळीराम शिंदे .यांची केस चालू होती यामध्ये भा द वी कलम - ३०२ व शस्त्र अस्त्र अधिनियम कलम ३, २५, २७ व इ अंतर्गत चालू असलेल्या तिहेरी हत्याकांड केस मधील आरोपी यांना पुणे येथील जिल्हा न्यायाधीश मे. क्षीरसागर सो .यांनी आरोपी यांना दोषी करार करत आजन्म करावासाची शिक्षा (जन्मठेप) केलेले आहे . या केस मध्ये मृतांच्या नातेवाईकांन तर्फे ( पीडित पक्षा तर्फे ) व सरकारी पक्षास सहाय्यक म्हणून आपल्या बारामती बार असोसिएशन चे जेष्ठ विधिन्या . श्री.ॲड अमर महादेवराव काळे.यांनी काम पाहिले आहे .
सरकार पक्षा तर्फे सदरील केस मध्ये एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले .त्या पैकी तिन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष ३ खुनाच्या आरोपामध्ये महत्वाची ठरली .याबाबत सविस्तर माहिती अशी की, दौंड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती या फिर्यादीत जबाब लिहुन देण्यात आला की, मी वरील ठिकाणी पत्नी सौ. स्नेहल शिंदे, मुलगी श्रावणी असे राहतो. माझा मोठा भाऊ गोपाळ काळुराम शिंदे, त्याची पत्नी, दोन मुले असे भवानीनगर, सरपंचवस्ती, दौंड या ठिकाणी राहण्यास असुन तेही माझे सारखा डक्टींगचा व्यवसाय करतात. आमचे दौंड गावातील वडारगल्ली येथील घरी माझे आई सौ. ताई काळुराम शिंदे, आई सौ. यल्लवा काळुराम शिंदे आणि वडील काळुराम गोविंद शिंदे असे राहतात. आई व वडील असे दोघेजण मसाला विक्री व्यवसाय करतात. आम्ही आमचे जन्मापासुनच दौंड या ठिकाणी रहावयास असल्याने मी दौंड भागातील आमचे वयाचे इसमांना आम्ही दोघे भाऊ ओळखतो. आम्ही दोघे भाऊ संजय बळीराम शिंदे रा.सरपंचवस्ती, दौंड जि.पुणे यांना शाळेत असल्यापासुन ओळखत आहे. तो सध्या आय.आर. बी. कोल्हापुर गुपमध्ये नोकरी करीत असुन सध्या एस.आर.पी.एफ. ग्रुप नं.७ दौंड या ठिकाणी आय.आर.बी.कोल्हापुर ग्रुपमध्ये नोकरी करीत आहे.
दिनांक. १६/०१/२०१८ रोजी दुपारी १.०० वाजण्याचे सुमारास मी घरी देवकीनगर येथे असताना माझे घरी मित्र आल्याने मी घरीच होतो. त्यावेळेस माझे मोठे भाऊ गोपाळ काळुराम शिंदे यांचा मला फोन आला व त्याने सांगितले की, "तु लवकर नगरमोरी चौकात ये, या ठिकाणी संजय बळीराम शिंदे हा माझेबरोबर पैश्याचे कारणावरून वाद घालत आहे.' असे सांगितल्याने मी माझे मोटार_सायकलवरून माझे सोबत माझे मेव्हणे (विश्वेश श्रीसुंदर, यांना घेवुन उड्डाणपुलावरून नगरमोरी चौकातील कटारिया यांचे वॉशिंग सेंन्टरजवळ आलो, त्यावेळी उड्डाणपुल ते नगरमोरी चौकाकडे जाणारे रोडलगतं माझा मोठा भाऊ गोपाळ काळूराम शिंदे, माझे मामाचा मुलगा परशुराम गुरूनाथ पवार आणि त्याचे सोबत संजय बळीराम शिंदे हे रोडचे बाजुस बोलत उभे होते, मी माझी मोटार सायकल शांताई हॉटेलचे मोकळे जागेत लावली व तेथुन रोड ओलांडुन भावाजवळ गेलो त्यावेळी त्यांचेत भावाने उसने घेतलेले पैश्यावरून वादविवाद चालु होता त्यावेळी मी भावाकडे पैशाबाबत चौकशी करून संजय शिंदे यास तुझे पैसे उदया मीं स्वतः देतो किरकोळ पैश्यावरून वाद करू नका असे म्हणुन समजावुन सांगितले व भावास तसेच मेव्हणे पवार यांना तुम्ही घरी जा, उदया मी पैसे देतो मला कामाचे ठिकाणी जावयाचे आहे. असे सांगुन मी भावास त्र मेव्हण्यास घरी जाण्यास सांगितले. संजय शिंदे यासही तुम्ही पण जा असे सांगुन मी रोड ओलांडीत असताना अचानक आवाज झाल्याने मी मागे वळून पाहिले, त्यावेळी माझा भाऊ आल्याने गोपाळ काळुराम शिंदे हा जमिनीवर कोसळला होता, तर मेव्हणा परशुराम गुरूनाथ पवार यास रिव्हाल्वर रोखुन संजय बळीराम शिंदे याने फायर केला, त्यावेळी तो सुध्दा जमीनीवर कोसळला. त्यादरम्यान मी घाबरून जोरात ओरडल्याने संजय शिंदे हा त्याचे जवळील रिव्हाल्वर त्याच्या पांढऱ्या रंगाच्या ज्युपीटर गाडीचे डिक्कीत ठेवून तो दौंड गावाचे दिशने निघुन गेला. त्यावेळी मी व विश्वेश यानी घाबरून मोठमोठ्याने ओरडुन लोकांना जमा करून माझा भाऊ 'यास मित्र भिमा रमेश शिंदे, आकाश जगदीप वाडीया व इतर लोकांचे मदतीने दोन रिक्षांमधुन लोणकर हॉस्पीटल, दौंड येथे आणले. त्यावेळी डॉक्टरांनी दोघांची तपासणी करून ते दोघेही मयत झाल्याचे घोषित केले होते, सदरची घटना ही दुपारी १.३० वाजण्याचे सुमारास घडली असुन त्यानंतर आम्ही लोणकर हॉस्पीटल येथुन दोन्ही मयत दोन्ही मयत बॉडी सरकारी हॉस्पीटलमध्ये घेवुन गेलो होतो.. त्यावेळी तेथे मला नाना देशमुख यांचेकडुन समजले की, माझे ओळखीचे अनिल विलास जाधव रा.जिजामातानगर, दौंड जि.पुणे याचेवर ही नगरमोरी चौक येथुन अनिल जाधव याचे राहते घरासमोर जावुन संजय बळीराम शिंदे याने त्याचेजवळचे रिव्हालव्हरमधुन फायर करून त्याचा ही खुन केलेला आहे. सदरची घटना ही दुपारी १.५० वाजण्याचे सुमारास घडलेली असुन त्यानंतर तो त्याचे पांढऱ्या रंगाच्या ज्युपीटर गाडीसह पळुन गेल्याचे समजले आहे.दिनांक.१६/०१/२०१८ रोजी दुपारी १.०० वाजता ते दुपारी २.०० वाजण्याचे दरम्यान मौजे. दौंड गावचे हददीत नगरमोरी चौक दौंड व अनिल विलास जाधव यांचे राहते घरासमोर जिजामातानगर, लिंगाळी ता. दौंड जि.पुणे या ठिकाणी यातील आरोपी नामे संजय बळीराम शिंदे रा. गोपाळवाडीरोड, सरपंचवस्ती, दौंड ता. दौंड जि.पुणे याचेकडुन माझा भाऊ गोपाळ काळुराम शिंदे वय. ३४ वर्षे रा. भवानीनगर, दौंड ता. दौंड जि.पुणे याने ऊसने घेतलेले पैश्याचे कारणावरून माझा भाऊ गोपाळ काळुराम शिंदे , माझा मेव्हणा प्रशुराम गुरूनाथ पवार वय.२८ वर्षे रा. वडारगल्ली, दौंड ता. दौंड जि.पुणे व आमचे ओळखीचा अनिल विलास जाधव, वय. ३४ वर्षे रा. जिजामातानगर, लिंगाळी ता. दौंड जि.पुणे यांना त्याचे जवळील रिव्हॉलवरमधुन माझा भाऊ व मेव्हणा यास नगरमोरीचौक, दौंड येथे व माझे ओळखीचा अनिल जाधव यास जिजामातानगर, लिंगाळी येथील त्याचे राहते घरासमोर रिव्हॉलवरमधुन गोळ्या झाडुन त्या तिघांचा खुन करून पळुन गेलेला आहे. म्हणुन माझी त्याचे विरूध्द फिर्याद आहे.यावरून कोर्टात केस चालू होती अखेर त्याचा निकाल झाल्याने श्री.ॲड अमर महादेवराव काळे यांचे कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment