बारामतीत 1 जून रोजी विश्वपूजा व सदभावना रैलीचे आयोजन..
रोजी शारदा प्रांगण, भिगवण चौक बारामती येथे सकाळी ११.०० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, माता रमाई आंबेडकर यांची विश्वपूजा आयोजित केली आहे. कार्यक्रम रूपरेषाची माहिती संस्थापक अध्यक्ष बबन आटोळे सर यांनी दिली आहे. तीर्थप्रसाद व महाप्रसाद-सकाळी
११.०० ते दुपारी ४.०० सदभावना रॅली (पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, माता रमाई यांची सामूहिक) - सायंकाळी ४.०० वाजता पेन्सिल चौक पासून भिगवण चौक पर्यंत सदभावना रॅली काढण्यात येणार आहे. रॅली साठी स्वतः
ची टू व्हिलर व फोर व्हिलर घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. तद्नंतर सायंकाळी ६.३० वाजता विश्वमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विश्वआरती होणार आहे. त्यासाठी स्वतः चे आरतीचे ताट (कापूर) घेऊन येण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. सायंकाळी ६.४५ वा. प्रास्ताविक, सत्कार समारंभ, मनोगते आणि
पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला
आहे. स्नेहभोजन ही रात्री ८.०० ते रात्री ११०० पर्यंत चालणार आहे. वरीलप्रमाणे जागतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी या विश्वपूजा, सदभावना रॅली आणि विश्व आरतीसाठी, पुरस्कार वितरण साठी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी आपला बहुमोल वेळ काढून आपण उपस्थित रहाण्याचीही विनंती / आवाहन जागतिक महोत्सव जयंती समिती च्या व संस्थापक अध्यक्ष बबन आटोळे सर, पुणे जिल्हा नेते अनिल आवळे ,मार्गदर्शक गजानन भगत, मार्गदर्शक महेंद्र खटके, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अरविंद वाघमोडे पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.अशी माहिती निखिल विठ्ठल बाराते पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी दिली.
No comments:
Post a Comment