ग्राहकाच्या अपेक्षा पूर्ण करणारी मन्याड फूड्स : धनंजय जामदार
बारामती:( प्रतिनिधी):-ग्राहकाची खरी गरज ओळखून ग्राहकाच्या अपेक्षाची परीपूर्णता करताना आरोग्यासाठी गुणवत्ता व दर्जात्मक पदार्थ मन्याड फूड्स च्या माध्यमातून ग्राहकांना कमी वेळेत घर पोहच उपलब्ध होणार त्यामुळे वेळ व पैसा वाचणार असल्याने ग्राहक समाधानी होतील अशी अपेक्षा बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केली.
बारामती एमआयडीसी येथील मन्याड ऍग्रो फुड्स इंडस्ट्रीज चा उद्घाटन समारंभ शनिवार ७ जून रोजी धनंजय जामदार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या वेळी जामदार बोलत होते.
राष्ट्रवादी उद्योग विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाराम सातपुते, सरचिटणीस प्रवीण जगताप,
या प्रसंगी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मनोज पवार, युवराज पाटील,महेश राऊत,नवनाथ नलवडे व उद्योजक मनोहर गावडे, महेश साळुंखे,हरिश्चंद्र खाडे,राहुल लावर, बाळासाहेब बाबरे,आप्पासाहेब चौधर,पोपट थोरात ,विवेक सातपुते व वंजारवाडी चे सरपंच जगन्नाथ वणवे व सागर दराडे, नितीन चौधर आणि नांदेड येथील उद्योजक संभाजी घुगे, आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी कुटुंबातील असून सुद्धा जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास च्या जोरावर शिक्षण,अनुभव घेऊन स्वतःच्या कर्तृत्ववावर व्यवसायात पदार्पण केले व सर्वसामान्य ग्राहकांची सेवा करीत विविध असल्याबद्दल मान्यवरांनी कौतुक केले.
बालकां पासून ते वयोवृद्ध ग्राहकांना पचेल,रुचेल व कमी किमतीत परवडतील असे आरोग्यसाठी परिपूर्ण पदार्थ मन्याड ऍग्रो फुडच्या माध्यमातून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे संचालक दगडोबा मुंडे यांनी सांगितले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार सौ. दैवशाला मुंडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment