पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 11, 2025

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ११: श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांची संबंधित वाहनचालकांनी १९ जून २०२५ पर्यंत तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
  
पालखी सोहळ्यावेळी देहू, आळंदी ते पंढरपूर या दरम्यान पालखी मार्गावर प्रवासी तसेच जड वाहने मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. या वाहनांतील तांत्रिक दोषांमुळे अपघात होऊ नयेत, वाहने रस्त्यात बंद पडून वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठीची उपाययोजना म्हणून वाहनचालकांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आळंदी रोड चाचणी मैदान व दिवे येथील टेस्ट ट्रॅक येथे कार्यालयीन वेळेत वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घ्यावी. 
वाहन तपासणीवेळी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, कर, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती व वाहतूक परवाना मुदतीत असल्याबाबतचे सर्व कागदपत्रे सोबत घेवून जावे. ही तपासणी विनामूल्य असून वाहन तपासणी केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन  घ्यावे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वाहनचालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment