माळेगावच्या साखर कारखाना अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे..
साखर कारखाना अध्यक्षपदी महाराष्ट्राचे
उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे ( पणदरे)यांनाही काम करण्याची संधी मिळाली. कोकरे हे नीरावागज गटातून ८ हजार चारशे चाळीस मते घेऊन
निवडून आल्या आहेत. त्यांनीही याआगोदर माळेगावचे संचालिका म्हणून 25 वर्ष धुरा सांभाळल्याची नोंद आहे.माळेगावची पंचवार्षिक निवडणूक २५ जून रोजी पार पडली. त्या निवडणूक प्रक्रियेत अजित पवार यांच्या
नेतृत्वाखाली निळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकत माळेगावची सत्ता पुन्हा खेचून आणली. विरोधी गटाला एका जागेवरच समाधान मानावले लागले. त्यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे एकमेव निवडून आले. त्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्या अधिपत्याखाली अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची
निवडणूक शांततेत पार पडली.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे,
कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी वरील निवडणूक प्रक्रियेचे प्रोसडींग पुर्ण केले. दरम्यान, माळेगावचे अध्यक्षपद आपण स्वतःकडेच ठेवणार असल्याचे अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वीच जाहीर केले होते. त्यानुसार
कारखान्याचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांच्या नावावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. मात्र उपाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.त्यानुसार कोकरे यांना उपाध्यक्ष पदावर काम करण्याची
संधी मिळाली.दरम्यान, पुढील पाच वर्षांचा कारभार कसा असेल, यावर थेट भाष्य करताना पवार यांनी निळकंठेश्वर पॅनेलचा झालेला एकतर्फी विजय आणि अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडणुकीवर समाधान व्यक्त केले. पुढील पाच वर्षात उसाच्या शेतात एआय तंत्रज्ञान आणून माळेगाव
कारखान्याचा कायापालट करून दाखवणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.त्याचबरोबर काटकसर आणि धोरणात्मक निर्णयावर भर
देत सभासदांना राज्यात सर्वाधिक ऊस दर देण्यावर आपला भर असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यामध्ये साखर कामगारांचेही प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी अवर्जून सांगितले. यावेळी
मावळते अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment