बारामती:-बारामती तालुका पोलीस स्टेशनला नुकताच एक गुन्हा रजिस्टर झाला,गुन्हा रजि नं- 270/2025 भा.न्या.सं.2023 चे कलम 325,3 (5), प्राणी छळ प्रति. अधि 1960 चे कलम 5 (अ), 5 (क),5 (ड), 9 (अ), 9(ब)गुन्हा दाखल असून फिर्याद राजु लकाप्पा बन्ने ब.नं 2717 नेमणुक बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी याबाबत दिली.यामध्ये आरोपी - 1) आजम बाबा कुरेशी रा खाटीक गल्ली ता बारामती जि पुणे (2) मुशरफ मौल्ला कुरेशी रा मोरगाव रोड कसबा ता बारामती जि पुणे व इतर दोन अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही यांचा समावेश असून दिनांक 05/07/2025 रोजी पहाटे 03/55 वा चे सुमारास मौजे तांदुळवाडी ता बारामती याठिकाणी कारवाई दरम्यान माल जप्त करण्यात आला 81,600/- रु किंमतीचे 160 रुपये प्रति किलो प्रमाणे 510 किलो वजनाचे गोमांस
1) 00.00/- रु किंमतीचे मांस कापायचे सतुर जु.वा. किं.अं
2) 2,00,000/- रु किंमतीची होंडा सिटी कंपनीची गाडी नंबर एम एच 14 ए व्ही 3373 जु.वा.किं.अं
3) 3,00,000/- रु किंमतीची पांढरे रंगाची पिकअप गाडी एम एच 14 इ एम 3391 जु वा किं अं
5,81,600/- रु येणे प्रमाणे असे असून याबाबत हकीकतअशी की, दिनांक 05/07/2025 रोजी पहाटे 03/55 वा चे सुमारास मौजे तांदुळवाडी ता बारामती जि पुणे घटनास्थळी मिळुन आले असुन वरील मांसाची तपासणी करणे करीता पशुवैद्यकीय अधिकारी बारामती यांना फोनद्वारे झाले प्रकाराची माहीती देवुन सदर ठिकाणी येण्यास सांगितले. काही वेळातच पशु वैद्यकीय अधिकारी बारामती हे घटनास्थळी दाखल झाले नंतर त्यांनी सदर मांसाची पाहणी करुन सदर मांसापैकी काही मांस सॅम्पल करीता काढुन घेण्याची व जागीच सिल करण्याची तजवीज ठेवुन त्यापैकी इतर उरलेले मांस पंचनाम्या प्रमाणे जप्त करुन सदर मांस हे नाशवंत व शरीरास अपायकारक असलेने ते नगरपालीका कर्मचारी बारामती यांचे मदतीने बारामती नगरपालीकेच्या जागेमध्ये कचरा डेपो येथे खोल खड्ा खोदुन पंचासमक्ष विल्हेवाट लावण्याची तजवीज ठेवली आहे. तरी इसम नामे 1) आजम बाबा कुरेशी रा खाटीक गल्ली ता बारामती जि पुणे 2) मुशरफ मौल्ला कुरेशी रा मोरगाव रोड कसबा ता बारामती जि पुणे व इतर दोन अनोळखी इसम नाव पत्ता माहीत नाही यांचे विरुद्ध भा.न्या.सं. 2023 चे कलम 325,3 (5), प्राणी छळ प्रति. अधि 1960 चे कलम 5 (अ), 5 (क),5(ड), 9 (अ), 9 (ब)अन्वये सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद जाधव यांनी दाखल केली असून तपासी अंमलदार - पोहवा मेहेर करीत आहे.
No comments:
Post a Comment