गणेशोत्सवानिमित्त माझी- इको फ्रेंडली गौराई स्पर्धेचे आयोजन..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 19, 2025

गणेशोत्सवानिमित्त माझी- इको फ्रेंडली गौराई स्पर्धेचे आयोजन..!

गणेशोत्सवानिमित्त माझी- इको फ्रेंडली गौराई स्पर्धेचे आयोजन..!

बारामती:-रागिणी फाऊंडेशन (बारामती) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही खास गणेशोत्सवानिमित ‘माझी ईकोफ्रेंडली गौराई‘ या गौरीआरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी 
१)  ‘पर्यावरण पूरक  आरास’ असणे महत्वाचे आहे. व आपल्या सजावटीतून समाजप्रबोधन करणाऱ्या संदेश देणे महत्त्वाचे आहे.
२) स्पर्धकाने व्हीडीओ तयार करताना स्वत ; गौरी आरास ची   माहिती द्यावी.गाणी टाकून तयार केलेले व्हिडीओ स्पर्धेसाठी  पात्र ठरणार नाहीत.
३)  व्हिडीओ ३ मिनिटांचा तयार करावा. स्पर्धकाने व्हीडीओ तयार करताना मोबाईल आडवा धरावा. व्हीडीओ  ५ सप्टेंबर २०२५ पर्यंत ९१४६७७६४५  या क्रमांकावर पाठवायचा आहे.
४)  स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क  १०० रु  असणार आहे.
५)    स्पर्धेत  सहभागी  होणाऱ्या स्पर्धकांची प्रथम ,द्वितीय ,तृतीय,उत्तेजनार्थ (२) बक्षिसाकरिता निवड केली जाईल , विशेष आकर्षण (२ ) अशी एकूण ७ बक्षिसे देण्यात येतील . प्रत्येक सह्भागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
६) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी दि पुढील क्रमांकावर नाव नोंदणी करावी.
७) उत्कृष्ट सादरीकरण, मांडणी, एकूण प्रभाव  अशा निकषांच्या आधारे  स्पर्धेचे परीक्षण केले जाणार आहे.

रागिणी फाऊंडेशन – ९६०४३९८६४५   
साक्षी आंबेकर-७३५०२५५९९७  पूजा आगम- ९०७५४१४३३६
ज्योती बोधे-९४२३५७०६९३
सुजाता लोंढे- ९८८१३८२७८३
प्रकाश(आबा) शिंदे – संस्थापक अध्यक्ष,आझाद तरुण मंडळ ,सणसर ९६५७२२०१०१

 तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन रागिणी फाऊंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे.

No comments:

Post a Comment