आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून तीन महिला आरोपींची बारामती जिल्हा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 18, 2025

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून तीन महिला आरोपींची बारामती जिल्हा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून तीन महिला आरोपींची बारामती जिल्हा न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता...
बारामती : बारामती न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या निकालामध्ये तिन्ही महिला आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 306, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये मृत इसमाची पत्नी, सासू व मेव्हणी यांचा समावेश होता. त्यांच्यावर मृत इसमाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता.मृत इसमाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती,सरकारी पक्षामार्फत या प्रकरणात अनेक साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने उपलब्ध पुरावे व साक्षांचा बारकाईने विचार करून तिन्ही महिला आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला.या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड.स्नेहा हेमचंद्र मोरे यांनी यशस्वीपणे काम पाहिले.

No comments:

Post a Comment