शासकीय कामात अडथळा आणल्याबददल आरोपीस एकूण ८ वर्षे सक्त मजुरी ११,००० रूपये दंड..
बारामती:-दिनांक १८/०८/२०२५ रोजी बारामती येथील मे. जिल्हा न्यायाधीश नं. ३ मा. हितेंद्र
अनिलकुमार वाणी साो, यांनी आरोपी नाव अरूण गणपत धायगुडे रा. धायगुडे वस्ती मोरगाव, ता.बारामती, जि. पुणे यास शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल २ वर्षे सश्रम कारावासाची व
५०००/- रुपये दंड व लोकसेवकास जिव मारणेची धमकी दिल्याबद्दल २ वर्षे सश्रम
कारावासाची व २००० /- रुपये दंड, आईवरून शिवीगाळ केल्याने २ वर्षे सश्रम कारावासाची व
२०००/- रुपये दंड, बेकायदेशीर रित्या कार्यालयात शिरकाव केल्याने २ वर्षे सश्रम कारावासाची
व २०००/- रूपये दंड असे एकुण ८ वर्षे सश्रम कारावास व ११,००० / - रुपये दंड व सदर
शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश मा. न्यायालयाने दिला आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक १८/०७/२०१३ रोजी आरोपी यांनी फिर्यादी
सुनिल सुब्राव महाडीक कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी शाखा मोरगाव हे
शाखेमध्ये काम करत असताना आरोपी गणपत अरूण धायगुडे हे कार्यालयात घुसुन आरोपीस
शिवीगाळ करूण दमदाटी करून फिर्यादी व साक्षीदार हयांना जिवे मारणेची धमकी दिली. मारहाण
केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनला
गु.र.नं ९८/२०१३ अन्वये फिर्यादी यांनी फिर्याद दाखल केली सदरील गुन्हयाचा तपास
तात्कालीन अनिल विठठल ओमासे पीएसआय यांनी केला तपास करुन कोर्टात दोषारोपपत्र दाखल
केले होते.
सदरील केसमध्ये फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी, पंच, प्रत्यक्ष साक्षीदार व महाराष्ट्र राज्य
विदयुत वितरण कंपनी तपासी अधिकारी एकुण पाच साक्षीदार यांच्या साक्ष नोंदवण्यात आली.
सदरील केसमध्ये सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता विकास घनवट यांनी काम पाहिले.
केसमध्ये अति. सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राहय धरुन शासकीय
कामात अडथळा आणल्याबद्दल भा. द. वी. कलम ३५३ शासकीय कामात अडथळा
आणल्याबद्दल २ वर्षे सश्रम कारावासाची व ५०००/- रुपये दंड व लोकसेवकास जिव
मारणेची धमकी दिल्याबद्दल २ वर्षे सश्रम कारावासाची व २००० /- रुपये दंड आईवरूण
शिवीगाळ केल्याने २ वर्षे सश्रम कारावासाची व २०००/- रुपये दंड बेकायदेशीर रित्या
कार्यालयात शिरकाव केल्याबद्दल २ वर्षे सश्रम कारावासाची व २००० /- रुपये दंड असे एकुण
८ वर्षे सश्रम कारावास व ११,००० /- रुपये दंड व सदर शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश मा.
न्यायालयाने दिला आहे. सदर प्रकरणी
पो.स. ई. जी. के. कसपटे, पो.स. ई. एन. ए.
नलवडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तसेच त्यास पोलीस हवलदार भागवत
पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment