"ए डालींग आय लव यु" असे म्हणाला,आरोपीस ६ महिने सश्रम कारावासाची व ३०००/-
बारामती:- बारामती येथील अति. जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एस. सस्ते
सो. यांनी सुनावली संजय प्रदिप इंगळे रा. झारगडवाडी, ता. बारामती, जि. पुणे, वय २१ यांस बारामती येथील मे.अति. जिल्हा न्यायाधीश मा. श्रीमती एस. एस. सस्ते यांनी आज बाल लैंगिक छळ प्रकरणी ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा व तीन हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कारावासाची शिक्षा, भा.द.वि. कलम ३५४-ड व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम १२ अन्वये सुनावली आहे.या प्रकरणाची हकीकत सदरचा गुन्हा हा ता. १०/०१/२०१६ रोजी सकाळी ११.३० वाजणेच्या सुमारास अल्पवयीन
मुलगी वय १६ वर्ष ही किराणा दुकानातुन माघारी घरी येत असताना आरोपी संजय प्रदिप इंगळे याने तिच्या मागोमाग येउन तिला "ए डालींग आय लव यु" असे म्हणाला. त्यामुळे पिडीत मुलगी घाबरली व रडत रडत घरी येउन तिने तिच्या आई वडीलांना सदरील घटना सांगितली. तिच्या वडीलांनी याबाबत त्याच दिवशी आरोपी विरूध्द बारामती तालुका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.सदर प्रकरणाचा तपास हा सुनिल गायकवाड, पोलीस उपनिरिक्षक यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सदरील केस चे कामकाज सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी
काम पाहिले, त्यांनी एकुण ०५ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी संजय प्रदिप इंगळे यांस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी वकील संदीप ओहोळ यांना पोलीस हवालदार रूपाली पवार, कोर्ट पैरवी सहायक फौजदार नामदेव नलवडे, जी.
के. कसपटे, रेणुका पवार म पो हवालदार यांनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment