बारामतीत अपघातात पाच वर्षांच्या मुलाचा गेला जीव... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 22, 2025

बारामतीत अपघातात पाच वर्षांच्या मुलाचा गेला जीव...

बारामतीत अपघातात पाच वर्षांच्या मुलाचा गेला जीव...
बारामती:-बारामतीत अपघात झाल्याचे दुर्देवी घटना अजून बारामतीकर विसरले नाहीत त्या हृदय पिळून टाकणारी घटनेची आठवण आली तरी अंगावर काटा येतो,असे अनेक अपघाती घटनेत बळी गेलेत आज तर एका लहान मुलाचा बळी गेला यामध्ये दाखल  फिर्यादीनुसार सौ. सुरेखा अनिल लोंढे वय-45 वर्ष धंदा-गृहीणी रा. गुणवडी गावठाण, बारामती ता. बारामती जि. पुणे यांनी आरोपी संदीप बाळासो भागवत रा. डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे यांच्याविरोधात फिर्याद दिली असून अथर्व अभिजीत लोढे वय 5 वर्ष रा. गुणवडी गावठाण, बारामती ता. बारामती जि. पुणे याचा अपघातात बळी गेला असून  फिर्यादी स्वतः जखमी आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की,अपघातातील वाहन पियाजो कंपनीची  थ्री व्हिलर माल वाहतुक रिक्षा एम. एच. 42/एस 4202  दिनांक 22/08/2025 रोजी दुपारी 03.20या. ये सुमा गुणवडी गावातील स्पिड बेकार क्रॉस करून
खरात दुकानाचे समोर रोडवरती बारामती जि. पुणे येथे  मी व नातू अथर्व असे रस्ता ओलांडून  घरी जात असताना बारामती बाजूकडून डोर्लेवाडी-सोनगाव बाजुकडे जाणाऱ्या पियाजो कंपनीची थ्री व्हिलर माल वाहतुक रिक्षा MH 42/एम 4202 ही वरील चालक संदीप बाळासो भागवत डोर्लेवाडी ता. बारामती जि. पुणे याने त्याचे ताब्यातील रिक्षा हयगयीने अविचाराने रस्त्याचे नियमांकडे दुर्लक्ष करून चालवून माझे किरकोळ व गंभीर दुखापतीस व माझा नातू अथर्व वय 5 वर्ष याचे मृत्युस कारणीभुत झाला म्हणून त्याचे विरुद्ध कायदेशिर तक्रार दाखल अमलदार म पो हवा गोरे यांनी करून घेतली असून अधिक तपास अंमलदार पो हवा मोरे करीत आहे.बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 306/2025 BNS 281,125(A),125(8),106(1)यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

No comments:

Post a Comment