बारामतीत कमिशनची रक्कम मागितल्याच्या
बारामती:- बारामतीत जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाहन विक्री
व्यवहाराची ठरलेली कमिशनची रक्कम मागितल्याच्या कारणावरून मारहाण करत
जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे,ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली(काटेवाडी, ता. बारामती)यांच्यासह अन्य दोघा अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी नागेश प्रकाश चंदनशिवे (रा. प्रगतीनगर,बारामती) यांनी फिर्याद ही दिली.
बुधवारी (दि. २०) सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. फिर्यादीने एका ट्रकच्या व्यवहारात मध्यस्थी केली होती.त्यापोटी त्यांना कमिशन येणे होते.ते मागितल्याने खताळ व अन्य दोघांनी त्यांना हाताने,लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
जातिवाचक शिवीगाळ करत यांना काय पैसे द्यायचे, मी पैसे देणार नाही, असे म्हणत डोक्यात दगड फेकून मारत दुखापत करण्यात आली. तुझा पाय काढून तुला ट्रकने उडवेल अशी धमकी
देण्यात आली.याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.
No comments:
Post a Comment