मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध : अजित पवार* *शेकडो मुस्लिम तरुणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 29, 2025

मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध : अजित पवार* *शेकडो मुस्लिम तरुणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश*

मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध : अजित पवार
*शेकडो मुस्लिम तरुणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश*
बारामती:प्रतिनिधी- मुस्लिम समाजातील समस्या सोडवत असताना तरुणांना  रोजगार,कर्ज,व्यवसाय, नोकरी आदी साठी सहकार्य करू व मुस्लिम समाजाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बुधवार २७ ऑगस्ट २०२५ रोजीपवार गटाचे पुणे जिल्हा युवकउपाध्यक्ष  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुणे जिल्हा फिरोज (मुन्नाभाई )बागवान व  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक बारामती अध्यक्ष अस्लम तांबोळी, तसेच बारामती चिकन विक्री मालक संघटना असोसिएशनचे अध्यक्ष मोईन (बुऱ्हाभाई)शेख, तसेच फुल अँड फायनल ग्रुप चे अध्यक्ष मोसिन पठाण व इतर फुल अँड फायनल ग्रूपचे दोनशे कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या वेळी अजित पवार बोलत होते. याप्रसंगी मा.नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, शिक्षण मंडळाचे मा.सदस्य अजीज शेख ,बारामती बँक चेअरमन सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.मुन्नाभाई यांच्या मागणी वरून बारामती शहरातील मुस्लिम कब्रस्तान मधील माती बदलणे व इतर सार्वजनिक समस्या सोडवू तसेच बारामतीचा विकास होत असताना मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेऊ व  विविध राजकीय पदावर कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पूर्वी पासून बारामतीच्या विकासात मुस्लिम समाजाचे योगदान असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचार धारेत कार्य करू व बारामती चे नाव उज्जवल करणार असल्याची प्रतिक्रिया फिरोज(मुन्नाभाई)बागवान व अस्लम तांबोळी यांनी दिली. सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी विशेष परिश्रम करणारे मा शिक्षण मंडळ सदस्य अजीज शेख यांचा सत्कार अजित पवार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment