जय हनुमान ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्यादित पिंपळी लिमटेकचा सहावा वर्धापन दिन उत्सवात पार..
बारामती:-जय हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. पिंपळी लिमटेकचा सहावा वर्धापन दिन पिंपळी येथील देवकाते पाटील यांच्या मिटिंग सभागृहात उत्सहात पार पडला.
स्वागत दिपक देवकाते पाटील यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब मल्हारी देवकाते पाटील यांनी प्रस्ताविक व्यक्त करून लेखा जोखा मांडला व सदर संस्थेचे भाग भांडवल एकोणतीस लाख पंचाहत्तर हजार आहेत तर सदर संस्थेकडे एकूण ठेवी एक कोटी छत्तीस लाख आहेत. सदर संस्थेचा दोन हजार चोवीस पंचवीस अखेरीस टर्नवर आठ कोटी एक्यानव लाख पंचाहत्तर पाचशे वीस रुपये एवढा आहे. तरी संस्थेसाठी जास्तीत जास्त सभासद,ठेवीदारांनी सदस्य व्हावे व सभासदांनी संस्थेमध्ये पैशावर विश्वास न ठेवता विश्वासावर विश्वास पैसे ठेवून जास्तीत जास्त ठेवींची गुंतवणूक करावी असे आवाहन त्यांनी केले.
तसेच संस्थेचे सचिव नवनाथ देवकाते पाटील यांनी सुरुवातीला संस्थेचे छोटे रोपटे होते पुढे ते वाढत जाऊन वटवृक्ष होण्याकडे वाटचाल होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच संचालक पृथ्वीराज घोलप,छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक संतोषराव ढवाण पाटील,संस्थेचे सभासद नानासाहेब बाबर यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभारच्या कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित छत्रपती कारखाना संचालक यांचा व प्रमुख उपस्थितांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच चहा नाष्टा आणि स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते.
यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याच संचालक पृथ्वीराज घोलप,संचालक अनिल काटे,संचालक सतीश देवकाते पाटील साहेब, संचालक बाळासाहेब कोळेकर,संचालक संतोष मासाळ,संचालक मंथन कांबळे,संचालक निलेश टिळेकर व बारामती तालुका फलोत्पादन संघाचे संचालक रघुनाथ मल्हारी देवकाते पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक संतोषराव ढवाण पाटील व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, बारामती खरेदी विक्री संघाचे मा.व्हा.चेअरमन भाऊसाहेब भिसे,सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर,दिपक देवकाते पतसंस्थेचे संचालक, सभासद, कर्जदार व ठेवीदार तसेच पतसंस्थेच्या सेविका अर्चना कोळपे,लक्ष्मी भोईटे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन अर्चना कोळपे यांनी केले तर आभार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सोशल मिडीयाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे यांनी मानून शुभेच्छा व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment