बारामती:- रागिणी फाऊंडेशन, बारामती आयोजित व आझाद तरुण मंडळ सणसर यांच्या सहकार्याने 'माझी इको फ्रेंडली गौराई' या गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बारामती, इंदापूर, माळशिरस, फलटण तालुक्यातील महिलांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे - आरती मोकाशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी सादर केलेला भारतीय संस्कृतीमधील वृक्षांचे महत्त्व ही सजावट लक्षणीय ठरली. द्वितीय क्रमांक- शीतल कदम बारामती, तृतीय क्रमांक कल्पना मेहेर,जगतापमळा, बारामती,उत्तेजनार्थ -काजल घोलप,सोमेश्वरनगर, उत्तेजनार्थ अतुल जाधव, काठी, इंदापूर विशेष आकर्षण- पुनम बाळापुरे, उघडेवाडी माळशिरस,अश्विनी शिळीमकर शिरवली, बारामती नीलिमा भोईटे, सणसर असे क्रमांक देण्यात आले.
विजेत्या स्पर्धकांना लेखिका, कवियत्री मंगलताई बोरावके व बारामतीचे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व लक्ष्मी पूजा भंडारचे संचालक विजय आगम यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
यावर्षी स्पर्धेचे सहावे वर्ष होते. सणवार पारंपारिक पद्धतीने साजरा करत असताना त्याला आधुनिकतेची जोड देण्यात यावी, व समाज प्रबोधन व्हावे या अनुषंगाने या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी केले.
पर्यावरण वाचवा, प्रदूषण, प्लास्टिक मुक्त जग, झाडांचे महत्त्व, लग्न सोहळा आणि संस्कृती, इंधन बचत काळाची गरज अशा विविध विषयांवर आधारित स्पर्धकांनी गौरी आरास केली होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूजा नाळे-आगम यांनी केले.तर कार्यक्रमासाठी रागिणी फाऊंडेशनच्या सदस्यांचे योगदान लागले. हा कार्यक्रम लक्ष्मी पूजा भांडार येथे संपन्न झाला.
No comments:
Post a Comment