बारामती:- बारामतीत सद्या घरगुती गॅसचा काळाबाजार राजरोसपणे चालू असून टेम्पोत व टू व्हीलर वरून गॅस काळ्या बाजारात विक्री होत असून हॉटेल, घरगुती, ढाबे, व्यावसायिक गाडे,गॅस वर चालणाऱ्या गाड्या अश्या अनेक प्रकारे वापरात येणाऱ्याला हा गॅस खुलेआम विकला जात असून तो थांबता थांबेना - बेकायदेशीर रिफिलिंगचा व्यवसाय पुन्हा जोमात असून बारामती परिसरात काही दिवसांपूर्वी
गॅस रिफिलिंगच्या बेकायदेशीर धंद्याचा पर्दाफाश झाला होता.बातम्या झळकल्या, प्रशासन हलले,
आणि काही दिवसांसाठी हा धंदा थांबल्याचा आभास निर्माण झाला.मात्र, आज पुन्हा परिस्थिती जसेच्या जसे घरगुती गॅस सिलिंडर
बेकायदेशीररीत्या रिफिलिंगचा धंदा पुन्हा जोमाने सुरू असून, गोरगरीब जनतेच्या सुरक्षेशी खेळ करण्याचे धाडस हे 'गॅस माफिया' बेधडकपणे
करत आहेत.अनेक ठिकाणी अंधारात, लपवाछपवीत गॅस सिलिंडरचे रिफिलिंग सुरू असून, प्रशासनाच्या डोळ्यांवर झापडे घातली आहेत का?असा प्रश्न जनतेतून विचारला जात
आहे. ज्वलनशील गॅसचे असे धोकादायक व्यवहार कधीही मोठा स्फोट घडवून आणू शकतात. मग याची जबाबदारी कोणाची? जीव
धोक्यात घालून काहीजणांच्या खिशात पैसे भरण्यासाठी कायद्याची सरळ पायमल्ली केली जात आहे. बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.
यामागे 'गुप्त पाठीराखे' कोण आहेत,
याची चौकशी होणे गरजेचे आहे. रोजच्या रोज सुरू असलेला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने फक्त कारवाई न करता ठोस पावले
उचलणे आवश्यक आहे.अशी मागणी होत असून नक्की ही कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.रोजच्या रोज सुरू असलेला हा व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाने फक्त
दाखवायची कारवाई न करता ठोस पावले
उचलणे आवश्यक आहे.आता प्रश्न असा आहे की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या 'गॅस
माफियां'ना आळा घालण्याची हिंमत प्रशासन दाखवणार की पुन्हा एखादा स्फोट होईपर्यंत सर्व झोपेतच राहणार?हे येणाऱ्या काळात कळेल पण अश्या व्यवसायाला पाठीशी घालत आहे त्यांनी याचं आत्मचिंतन करावं असं बोललं जातंय.
No comments:
Post a Comment