बारामती:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्फत 20 लाख रू निधी मंजूर झाला आहे. मेडद गावात हे पहिलेच बौद्ध समाजाचे समाजमंदिर आहे यासाठी अनेकदा आंदोलन व जागेसाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागले आहेत.स्थानिक अडचणी सोडवून या कामाला आज सुरवात केली आहे,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह मेडद याचे काम करण्यासाठी आत्ता 20 लाख रू निधी आला आहे परंतु त्या मध्ये आत्ता तयार केलेल्या प्लॅन इस्टिमेट नुसार हे काम पूर्ण होणार नाही तरी त्याला वाढीव निधी अजून किमान 30 लाख रुपयांची गरज आहे.
येणाऱ्या काळात आम्ही माननीय अजितदादा पवार यांच्यामार्फत हा निधी उपलब्ध करून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करू *असे आश्वासन मेडद चे माजी उपसरपंच अजित कांबळे यांनी दिले*
यावेळी काम सुरू करत असताना मिळत ग्रामपंचायत सदस्य रोहिणी कांबळे अध्यक्ष प्रशिक कांबळे व कांबळे परिवार महिला व ग्रामस्थ तरुण उपस्थित होते.
आज काम सुरू केले असता समाजातील सर्व तरुण ऋषिकेश कांबळे,अजय कांबळे,अक्षय कांबळे,करण कांबळे,अजय गरुड,सुशांत कांबळे या सहकार्य एकत्र येऊन समाज मंदिराच्या कामासाठी पाण्याचा तुठावडा निर्माण होऊ नये म्हणून लोकवर्गणी करून त्या ठिकाणी बोर मारून पाण्याची व्यवस्था करून दिली आहे.
No comments:
Post a Comment