उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक मालमत्तेच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 3, 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक मालमत्तेच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक मालमत्तेच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती..
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती वाहतूक शाखा आणि विद्या प्रतिष्ठान सुपे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सार्वजनिक मालमत्तेचा सुयोग्य वापर तसेच रस्ते सुरक्षाबाबत शहरातील विविध चौकात जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस कर्मचारी, विद्या प्रतिष्ठान सुपे संकुलाचे प्राचार्य डॉ. संजय काळे, डॉ . योगेश पाटील, प्रा . निकिता गाडेकर, प्रा. आरती वाबळे, दीपक कुंभार,  राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.  

श्री. यादव म्हणाले, नागरिकांनी रस्ते सुरक्षा विषयक नियमांचे पालन करुन अपघात टाळण्याकरिता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. सार्वजनिक मालमत्तांची काळजी, रस्ते सुरक्षा विषयक जनजागृती करण्याकरिता बारामती बस स्थानक, रेल्वे स्थानक, एमआयडीसी परिसरासह शहरातील महत्वाच्या चौकात फलकाद्वारे जनजागृती करण्यात आली. 
प्राचार्य डॉ. संजय काळे म्हणाले, नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या ‘आयईएस’ या शैक्षणिक परिसंवादाच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार याचे विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. बारामती येथील सार्वजनिक ठिकाणे सुस्थितीत ठेवण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत सार्वजनिक मालमत्तेच्या वापर करण्याबाबतचा संदेश पोहोचविणे हे या कार्यक्रमामागील उद्देश आहे. 

*चौकट :*
*श्री. सुनील मुसळे, विशेष कार्य अधिकारी:* उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यात विविध विकास कामे करण्यात येत आहे.  दर्जेदार, पर्यावरणपूरक सार्वजनिक इमारती निर्माण होत असून या इमारती सार्वजनिक मालमत्ता ही आपली संपत्ती आहे, त्यामुळे त्याचे विद्रपीकरण होणार नाही, याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी.

No comments:

Post a Comment