बापरे..बारामती पंचायत समितीच्या अधिकाऱ्याचा लाचखोरीचा व्हिडीओ व्हायरल. माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून पर्दापाश... बारामती(संतोष जाधव):-बारामती पंचायत समितीच्या अधिकाऱ्याचा लाचखोरीचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याची सगळीकडे प्रसिद्ध होत आहे याबाबत माहिती अधिकार कार्यकर्त्याकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे यांनी सांगितले.याबाबत समजलेली माहिती अशी की,बारामती पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्याने कामाच्या बिलापोटी ठेकेदाराकडून २९ हजार रुपये घेतल्याच्या व्हिडिओने बारामतीत सध्या खळबळ उडाली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच हा व्हिडिओ दाखवला. उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना चौकशी करत कारवाईचे आदेश दिले. परंतु संबंधितावर अद्याप कारवाई झालेली नसल्याचे कळतंय, हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट धवडे यांच्या खात्यावर संबंधित अधिकाऱ्याने एक लाख रुपये पाठवले आहेत. त्यानंतर धवडे यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी यांना निवेदने पाठवत पुराव्यानिशी ही बाब कळवली आहे. रस्त्याच्या एका कामापोटी ठेकेदाराकडून या अधिकाऱ्याने २९ हजार रुपये स्वीकारले. धवडे यांना या प्रकरणाची माहिती मिळाल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले.त्यामुळे त्याने प्रकरण वाढवू नये,यासाठी धवडे यांना अॅपवरून ऑनलाइन एक लाखाची रक्कम पाठवली. परंतु धवडे यांनी ही रक्कम संबंधित अधिकाऱ्याला लागलीच ऑनलाइन परत केली.
शिवाय पोलिस अधिकाऱ्यांना तत्काळ निवेदने देत घडल्या प्रकाराची माहिती दिली.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेत व्हिडीओ दाखवला.अजितदादा पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करून कारवाईचे चौकशी आदेशही लागलीच दिले.परंतु अद्याप
कारवाई झालेली नाही.असे पोपट धवडे (माहिती अधिकार कार्यकर्ता)यांनी सांगितले यावेळी ते बोलताना म्हणाले " बारामती परिसरात मी सामाजिक काम करतो. संबंधित अधिकाऱ्याचा व्हिडीओ माझ्याकडे आल्यावर त्यांनी प्रकरण शांत करावे यासाठी एक लाख रुपये माझ्या खात्यावर टाकले.मी त्यांना ते लागलीच माघारी पाठविले.आर्थिक देवाणघेवाण दाखवून मला
अडकविण्याचा, फसविण्याचा किंवा खोटे
गुन्हे दाखल करण्याचा या अधिकाऱ्याचा
प्रयत्न असू शकतो. त्यामुळे मी तत्काळ पोलिस विभागालाही ही बाब निवेदनाद्वारे कळविली आहे.
No comments:
Post a Comment