वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या वतीने पूर ग्रस्तांना मदत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 5, 2025

वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या वतीने पूर ग्रस्तांना मदत..

वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या वतीने पूर ग्रस्तांना मदत..
बारामती:प्रतिनिधी:-मराठवाड्यातील पूरग्रस्तांना एक लाख ११ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे प्रतिपादन वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे अध्यक्ष डॉ अशोक तांबे यांनी केले.
बारामती येथील वीर सावरकर स्वीमर्स क्लब ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.५  ऑक्टोम्बर रोजी संपन्न झाली.यावेळी  डॉ अशोक तांबे सभासदांना मार्गदर्शन करत होते.याप्रसंगी उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर ,सचिव विश्वास शेळके, खजिनदार मिलिंद अत्रे ,संचालक अमोल  ,बाळासाहेब टाटिया, अनिल सातव,दीपक बनकर, पंढरीनाथ नाळे,डॉ. गीता होरा ,कु शर्मिष्ठा जाधव, सल्लागार सदाशिव सातव, राजेंद्र जाधव, महेंद्र ओसवाल व सभासद उपस्तीत होते.
 स्वीमर्स क्लब साठी स्व मालकीची जागा विकत घेणे, महिलांचा नवीन अत्याधुनिक टॅंक तयार होत आहे ,पोहण्याची वेळ, आजीव सभासद च्या वारसांना सभासद करून घेणे, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर  क्लबचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंना मदत करणे आदी विषयावर चर्चा झाली.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सभासद व  विविध खेळातील खेळाडू आणि  जलतरण पट्टू  यांचा खास सन्मान करण्यात आला.अहवाल वाचन सचिव विश्वास शेळके यांनी केले.सभासदासाच्या शंकाचे निरसन व प्रश्नांना उत्तरे  संचालक मंडळ यांनी दिले.
 सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले व आभार व्यवस्थापक सुनील खाडे यांनी मानले.


No comments:

Post a Comment