खळबळजनक..कोर्ट कमिशनरवर हल्ला करीत १८ लाख रुपये किंमतीचा आयशर टिपर चोरल्याची घटना.. बारामती:- नुकताच बारामती शहरानजिक घडलेल्या घटनेची बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मद्रास हायकोर्टाने नेमलेल्या कोर्ट कमिशनरवर हल्ला करून तब्बल १८ लाख रुपये किंमतीचा आयशर टिपर जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साधारण ५.५७ वाजता मौजे कन्हेरी
गावच्या हद्दीत पालखी महामार्गावर घडली.या प्रकरणी कोर्ट कमिशनर, मद्रास हायकोर्ट, रा.
चेन्नई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, मा.
न्यायालयाच्या आदेशाने आयशर प्रो २०८०
एक्सपीटी टिपर ( एमएच ४२ बीएफ ४९४५ ) हे
वाहन क्रेनच्या सहाय्याने ताब्यात घेऊन नेत
असताना, आरोपी महादेव धोत्रे, त्याचा मेव्हणा,
तसेच दिपक माने व एका अनोळखी व्यक्तीने
अडवले.या आरोपींनी अशोक लेलँडची गाडी व
मोटारसायकलने क्रेनला अडवून फिर्यादी व त्यांच्या स्टाफला शिवीगाळ, दमदाटी केली तसेच
मारहाणीची धमकी दिली. त्यानंतर क्रेनचालकाला
धमकावून ताब्यात घेतलेले वाहन जबरदस्तीने
पळवून नेले. सदर आयशर टिपरची किंमत सुमारे
१८ लाख रुपये इतकी आसल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment