बारामतीच्या राजकारणातल्या शुक्राचार्याच्या भूमिकेचा बोध आत्ता तरी घेतला जाईल का?.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, November 14, 2025

बारामतीच्या राजकारणातल्या शुक्राचार्याच्या भूमिकेचा बोध आत्ता तरी घेतला जाईल का?....

बारामतीच्या राजकारणातल्या शुक्राचार्याच्या भूमिकेचा बोध आत्ता तरी घेतला जाईल का?....  बारामती:-बारामती नगर परिषद निवडणूकीची रंगत वाढत असून सद्या अनेक उमेदवार निवडणुकीच्या तालमीत उतरण्याची तयारी करीत असून बारामती नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्याने बारामतीचा नगराध्यक्ष कोण होईल यावर नुसत्या चर्चा रंगत असून अजूनही राष्ट्रवादी कॉग्रेस,भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस(श प गट)सह इतर पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला नसला तरी,बहुजन समाज पार्टी व अपक्ष असे दोन उमेदवार यांनी फॉर्म भरला आहे, पण ज्याला राजकारणातला शुक्राचार्य समजला जातो ते आज आपल्या गटाचा उमेदवार व्हावा यासाठी कोणती रणनीती आखत आहे, हे लवकरच दिसेल पण मतदारांना याची उत्सुकता लागली असून कोणाच्या गटाचा नगराध्यक्ष यांचे नाव येईल हे पाहत आहे, कारण येणारा नगराध्यक्ष हा नामधारी असणार असून त्याचा कारभार हा हे ठेवणीतले शुक्राचार्य चालविणार असल्याचे कळतंय कारण याआधीची परिस्थिती बारामती साठी नवी नाही,तसेच प्रभागात आपल्या गटाचा नगरसेवक देताना मात्र स्थानिक कार्यकर्ते यांचा राजकीय बळी जातो,पक्ष व नेत्याकडे पाहून काम करणारा कार्यकर्ता यांच्यावर लादलेला व सोयीनुसार वागणारा नगरसेवक निवडून आल्यावर पाच वर्षे आपल्या प्रभागात फिरकत देखील नाही हा आजपर्यंतचा घडत आलेला इतिहास बारामतीकर पाहत आहे, यामुळं यंदा देखील नेते या शुक्राचार्य यांनी ठरविलेल्या भूमिकेची री पुढे ओढणार की काही बदल करून खऱ्या व पक्षाशी एकनिष्ठ काम करणाऱ्या उमेदवाराला संधी देतील की आपल्या मर्जीतला उमेदवार नसल्याने एखादा डमी उमेदवार उभा करून त्याला आतून कुरघड्या करण्यासाठी व समोरच्या उमेदवारांचे मताची आकडेवारी कमी करण्याचा प्रयत्न करतील हे कळेल, पण आत्तातरी अश्या शुक्राचार्यापासून काही बोध घेतील का अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment