बारामती बाजार समिती मध्ये गतवर्षी प्रमाणे शुक्रवार पासुन कापसाचे लिलाव सुरू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 18, 2025

बारामती बाजार समिती मध्ये गतवर्षी प्रमाणे शुक्रवार पासुन कापसाचे लिलाव सुरू



बारामती बाजार समिती मध्ये गतवर्षी प्रमाणे शुक्रवार पासुन कापसाचे लिलाव सुरू 
बारामती:-बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात दरवर्षी प्रमाणे या हंगामातील शेतक-यांचे मागणीनुसार कापुसाचे लिलाव उघड पद्धतीने शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर २०२५ पासुन सुरू होत आहेत. सध्या कापसाची काढणी / वेचणी  हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतक-यांनी आपला कापुस वाळवुन आणि स्वच्छ व ग्रेडींग करून आणावा असे आवाहन सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे. याचा लाभ शेतक-यांनी घ्यावा.  
बारामती मुख्य आवारात दर शुक्रवारी या दिवशी दुपारी १ वाजता कापसाचे लिलावा सुरू होतील असे बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांनी सांगितले.  बारामती बाजार समिती मध्ये शेतमालाचे वजन लिलावापुर्वी केले जाते अशी पद्धत आहे. बाहेरील पेठेतील व स्थानिक खरेदीदार असल्याने  शेतक-यांना गतवर्षी कापसास योग्य दर मिळाले. लिलावात कापसाचे दर प्रतवारीनुसार मिळत असल्याने शेतक-यांनी आपला कापुस खाजगी बाजारपेठेत  परस्पर विक्री करू नये. बाहेर पैशाची हमी व वजनाची खात्री देता येत नाही. त्यामुळे शेतक-यांनी आपला कापुस हा शेतमाल बारामती बाजार आवारात विक्रीस आणावा असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी केले.

No comments:

Post a Comment