बारामतीतुन काम उरकून गावी जाणाऱ्या कामगारांचा आयशर टेम्पो दरीत कोसळल्याने 13 जखमी,7 जणांची प्रकृती गंभीर..
घेऊन जाणारी मालमाहू टेम्पो 100 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात 13 कामगार जखमी झाले असून, त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमी मजूर आणि लहान मुलांच्या वेदनांनी उपस्थितांचे मन सुन्न झाले.माळेगाव सहकारी साखर कारखाना, बारामती येथून दस्तापूर (ता.
सोयगाव) येथे मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो (क्र. MH 21 भाऊ 0442) रविवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास कन्नड- नागद मार्गावरील म्हसोबा वळणाजवळ पोहोचला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पो खोल दरीत कोसळला. दरीत पडताना वाहनाने चार वेळा पलट्या घेतल्याने यामध्ये प्रवासी जखमी झाले,या अपघातात वंदना अशोक अंभोरे, रुकसाना सलीम तडवी,दिव्या हिरामण पगारे, सोनाबाई सलीम तडवी, रंजनाबाई हिरामण
पगारे, आशा सुखदेव पगारे, कोमल हिरालाल पगारे, मनीषा प्रवीण वाघ, प्रवीण बापू वाघ, ममता प्रवीण वाघ, ऋतिक प्रवीण वाघ, सलीम जमाल तडवी, अजित मुक्तार तडवी (सर्व रा. दस्तापूर,ता. सोयगाव) तसेच चालक महेश दीपक माने (रा. बारामती)यांच्यासह लहान बालके, असे एकूण 17 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस आणि प्रशासनाचे मदतकार्य घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर आणि प्रदीप पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. कन्नड ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिका तातडीने बोलावून जखमींना
उपचारासाठी हलविण्यात आले,ग्रामीण रुग्णालयात डॉ. रुक्सान खान यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय,छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. यावेळी तहसील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंडळ अधिकारी तुकाराम सपकाळ व ग्राम महसूल अधिकारी नितीन मगरे यांनी मदतकार्याला
No comments:
Post a Comment