बारामतीत बनावट नावे नोंदवणे,बिलांची उधारी दाखवणे आणि हिशोबात फेरफार करीत 34 लाखाचा अपहार प्रकरणी पोलिसांची कारवाई.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

बारामतीत बनावट नावे नोंदवणे,बिलांची उधारी दाखवणे आणि हिशोबात फेरफार करीत 34 लाखाचा अपहार प्रकरणी पोलिसांची कारवाई..

बारामतीत बनावट नावे नोंदवणे,बिलांची उधारी दाखवणे आणि हिशोबात फेरफार करीत 34 लाखाचा अपहार प्रकरणी पोलिसांची कारवाई..
बारामती :- अपहार प्रकरणी सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या बारामती शहर हॉटेल व्यवसायात केला होता मोठा अपहार याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी कारवाई केली याबाबत मिळालेली माहिती अशी की, हॉटेल व्यवसायात व्यवस्थापक
(मॅनेजर) म्हणून काम करताना तब्बल 34 लाख 33 हजार 393 रुपयांचा अपहार करून सहा
महिन्यांपासून फरार असलेल्या दत्तात्रय पोपटराव खुळे (रा.माळेगाव, ता. बारामती) याला
पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.आरोपी दत्तात्रय खुळे हा एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता. त्याने मालकाचा
विश्वास संपादन केला आणि त्याचाच फायदा घेत आर्थिक गैरव्यवहार सुरू केले. ग्राहकांची
बनावट नावे नोंदवणे, बिलांची उधारी दाखवणे आणि हिशोबात फेरफार करून त्याने एकूण
34.33 लाख रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316 (4) आणि 318 (4) अन्वये गुन्हा दाखल
करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार
झाला होता. मात्र, बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीदारांचे जाळे सक्रिय केले होते. आरोपीचा ठावठिकाणा मिळताच पोलीस पथकाने अत्यंत नियोजनबद्ध
सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

No comments:

Post a Comment