बारामती : भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती-जमाती मोर्चा बारामती शहराध्यक्षपदी महेश चंद्रकांत नेटके यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष सुजित वायसे यांनी ही निवड केली. जिल्हाध्यक्ष शेखर वाढणे यांच्या हस्ते महेश नेटके यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर दिला
जाणार असल्याचे नेटके यांनी सांगितले. या वेळी शहाजी कदम, प्रमोद डिंबळे, संतोष जाधव, रोहित शिंदे, रोहन फासगे, सोनी नेटके,करण गायकवाड, महेश खरात, अक्षय लांडगे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment