बारामती नगरपरिषदेतील श्रीरामनगर येथील शाळेतील गरीब व गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप
बारामती :-श्रीरामनगर नगरपरिषदेतील गरीब व गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. "आस प्रतिष्ठान, भारत " यांनी जर वर्षाची आपली परंपरा व आपली सामाजिक बांधलकी राखत याही वर्षी शालेय वस्तू वाटपाचाकार्यक्रम घेण्यात आला. या मध्ये बालवाडी ते प्राथमिक शाळेतील मुलां -मुलींना पाठी, पेन्सिल, पेन, थ्री इन वन वही, कंपास, वॉटर बॅग, टीपीन बॉक्स, एक रेगी वही, उजळणी, तेलखडू, कॅच पेन, खोडरबर, शॉपणर, इत्यादी वस्तू गरजू मुलांना वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी अंगणवाडीच्या सेविका विजया जगताप मॅडम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यपिका सौ. संगीता देशमुख व "आस प्रतिष्ठान,भारत "च्या अध्यक्षा सौ. सुप्रिया जगताप, श्री.प्रशांत गाढवे, श्री. आलताब मुलाणी, श्री. विनायक गावडे (खरेदी -विक्री संघांचे सभापती ), श्री. पंकज भाऊ भोसले व श्री. प्रशांत शिंदे पाटील (माळेगावं सहकारी साखर कारखाण्याचे मा. संचालक ), तसेच उद्योजक श्री. मंगेश वेदपाटक, श्री. जमीर बागवान, बागायतदार श्री. बापूराव मोरे व जरीना इनामदार यांनी या उपक्रमाला मोलाची मदत केल्या बद्दल आस प्रतिष्ठान,भारत चे सचिव श्री. शिहान गणेश(बाबा )भिमराव जगताप यांनी सर्वांचे आभार मानले व असेच सामाजिक उपक्रमाला अशीच साथ मिळावी या साठी सर्वांचे आभार मानले.
या सामाजिक उपक्रमाला श्रीरामनगर मधील नगरसेवक श्री. अभिजित जाधव तसेच नगरसेवक श्री. बिरजूभैय्या मांढरे, शंकर नागरी पथसंस्थेचे गजानन काळे, श्री. सुनील शिंदे, श्री अतुलशेट गोटे यांनी आस प्रतिष्ठान,भारत यांच्या सर्व सभासदांचे व आर्थिक मदत करणाऱ्यांचे आभार मांडून असेच आस प्रतिष्ठान,भारत यांनी आपले सामाजिक ऋण फेडावे व आपले सामाजिक कार्य असेच चालू ठेवावा अश्या शुभेच्या दिल्या.
No comments:
Post a Comment