चाळीसगाव:-लाच घेताना अधिकारी सापडत असल्याचे पुढे येत असून कामाचा दर्जा देखील घसरत असल्याने या लाच घेण्यापायी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे दिसत आहे,यातच ठेकेदार यांच्याकडून टक्केवारी देखील घेतली जात आहे,नुकताच कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती सात हजार रुपये स्वीकारताना चाळीसगाव येथिल जिल्हा
परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवार दि. सात जुलै रोजी दुपारी रंगेहात पकडले. एसीबीच्या माहितीनुसार, यथार्थ पांडुरंग निनावे (वय ४५),उपविभागीय अभियंता (वर्ग-१) यांनी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या एक टक्क्याप्रमाणे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर सात हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
ही रक्कम कुलदीप विरुचंद गमे (वय ३०), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (वर्ग-३) यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले. तक्रारदाराच्या
मित्रानेतालुक्यातील दहिवद येथे ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून रस्ता काँक्रीटीकरण व
गावहाळाचे काम घेतले होते. संबंधित काम पूर्ण होऊन मोजमाप व मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहा लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजुरीसाठी उपविभागीय अभियंत्यांकडे पाठविण्यात आले होते.बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी झाल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली.तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर एसीबीने
सापळा रचला. त्यावेळी उपविभागीय अभियंता निनावे यांनी कुलदीप गमे यांच्या हस्ते सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (सुधारित)कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या
नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे करीत आहेत.
No comments:
Post a Comment