*सकल मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा बारामतीचे मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन*
मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अंतरवाली सराटी आंदोलनाला पाठिंबा
बारामती : सकल मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, बारामतीच्या वतीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बारामती प्रशासकीय भवन येथे निवेदन देण्यात आले. हे निवेदन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनाही देण्यात आली असून, सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक व तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली. तसेच अंतरवाली सराटी, जिल्हा जालना येथे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
“मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बारामतीतून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व सदस्य तसेच सकल मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment