मनोज कुंभार यांना जिल्हास्तरीय गुणवंत कलाशिक्षक पुरस्कार..
बारामती :- कलाक्षेत्रासोबतच विविध क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन यावर्षीचा महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ शाखा यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा जिल्हास्तरीय गुणवंत कला शिक्षक पुरस्कार विद्या प्रतिष्ठान मधील कलाशिक्षक मनोज शरद कुंभार यांना प्रदान करण्यात आला आहे.
जिद्द सातत्य आणि आपल्या कलेच्या जोरावर कलाक्षेत्रात तसेच विविध सामाजिक, व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे श्री मनोज कुंभार हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएसई मध्ये कार्यरत असून ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळखले जातात.
गेली अनेक वर्षांपासून श्री मनोज कुंभार हे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित असतात ते विद्यार्थ्यांसाठी गणपती बनवणे कार्यशाळा, मूर्ती रंगभरण तसेच भीमथडी इतिहास संशोधन संस्थेच्या माध्यमातून बारामती परिसरातील विविध ऐतिहासिक वास्तू बद्दल जागृती करण्यासोबतच भव्य चित्रकला स्पर्धांचे देखील आयोजन करीत असतात.वृत्तपत्रे, मासिके, विविध पुस्तकांची मुखपृष्ठ यासाठी काम करणारे मनोज कुंभार पर्यावरण चळवळीसाठी शाडू मातीचे गणपती बनवितात.
हा पुरस्कार अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या हस्ते v गजानन लोणकर सर , श्रवण जाधव सर , कृष्णा तामकर सर ,बापुराव कदम , नवनाथ कुंभार ,सचिन कदम सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
हा सन्मान केवळ मला मिळालेला नसून कलेसाठी झटणाऱ्या प्रत्येकाचा आहे.लहानपणापासून घरात मूर्तिकाम करण्याचा वारसा आहे त्यामुळे आपल्याला आवड निर्माण झाली. हा पुरस्कार आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या सर्वांना समर्पित करत असल्याची माहिती मनोज कुंभार यांनी दिली.
No comments:
Post a Comment