सोन्याची दागिने चोरी करणारी अंतरजिल्हा टोळीस अटक;४ तोळे सोने असे एकुन ४,९०,००० किंमत्तीचा मुद्देमाल हस्तगत..
पुणे :- एसटी बस स्थानक परिसरात व एसटी बस मध्ये सोन्याची दागिने चोरी करणारी अंतरजिल्हा टोळीस अटक करून ०४ तोळे सोने असे एकुन ४,९०,००० किंमत्तीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व मंचर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणची कारवाई,
मा.पोलीस अधीक्षक श्री.संदीप सिंह गिल्ल , पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे
पोलीस निरीक्षक, श्री. प्रमोद क्षीरसागर, व मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षीक, श्री. महादेव वाघमोडे यांना गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अबाधित ठेवण्यासाठी मागदर्शक सूचना दिल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलीस स्टेशन कडील पथके तयार करुन त्यांना सराईत पाहिजे / फरार गुन्हेगारांवर
कारवाई करणेकरीता हददीत पेट्रोलींग करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिग गुन्हे शाखा व मंचर पो स्टे कडील पथके मंचर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली
की, एस.टी बस स्टॅन्डवर व एस.टी बस मध्ये सोन्याचे दागिन्याची चोरी करणारी टोळी मंचर एसटी स्टॅड येथे येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने लागलीच पथकांनी मंचर एसटी स्टॅन्ड येथे जावून सापळा लावून थांबले असता मिळाले माहिती प्रमाणे एक इसम संषयीतरित्या एसटी स्टॅन्डवर फिरताना दिसला त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अशोक बबन भोसले रा. कासारी ता. आष्टी , जि. बीड,
सध्या रा. हिवरगाव फाटा ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितनले. त्याला विश्वासात घेवून विचारपुस करता त्याने मंचर एसटी स्टॅड परीसरात व एसटी बस मध्ये महिला नामे अश्विनी अविनाश भोसले हिचे मदतीने महिलाच्या गळयातील व पिशव्यांमधील सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याचे सागितल्याने आरोपी नामे १) अशोक बबन भोसले रा. कासारी ता. आष्टी, जि.बीड, सध्या रा. हिवरगाव फाटा ता. श्रीगोंदा,जि. अहिल्यानगर, २) सौ. अश्विनी अविनाष भोसले, रा. माहिजळगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर, ३) सतिष मधूकर गोरे, शिवाजीनगर जामखेड ता.जामखेड जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेवुन गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असून त्यांचेकडून १) मंचर पोलीस ठाणे गु.र.नं. १४१/२०२६ बी. एन. एस. कलम ३०३ (२), २)मंचर पोलीस ठाणे गु.र.नं. १२० / २०२६ बी. एन. एस. कलम ३०३ (२) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले ४
तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे असे एकूण ४,९०,०००/- रूपये किमंतीचे गुद्देमाल जप्त करण्यात असुन दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. संदीप सिंग गिल्ल, अपर पो. अधिक्षक मा. श्री. शुभम कुमार, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, श्री. महोदव वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहा. पोलीस उपनिरीक्षक, शरद
बांबळे, पोहवा /संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे, अतुल डेरे तसेच मंचर पोलीस स्टेशन कडील सुदाम घोडे, संजय नाडेकर, शेखर भोईर, योगेश रोडे, अजित पवार, विनोद जांभळे, मपोकॉ. अलिशा शेख यांनी केली आहे. पुढील तपास स्था.गु.शा. व मंचर पो स्टे चे वतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment