अजितदादांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक मदतीचा हात; सुरज देवकाते यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप..
बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
बारामती:- दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क अधिकारी सुरज देवकाते यांच्या वतीने बारामती नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या, लेखन साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक साहित्याची अडचण निर्माण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा आणि शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना अधिक आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजक सुरज देवकाते यांनी सांगितले. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू ठेवण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. संभाजी होळकर, ॲड. किरण इंगळे, विशाल जाधव, श्वेता नाळे, भारती शेळके, साधू बल्लाळ, तानाजी पाथरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज देवकाते यांनी केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे, बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, उपगटनेते संपदा चौधर, महिला व बालकल्याण सभापती सविता जाधव, नगरसेविका धनश्री बांदल, अनुप्रिता डांगे, भारती शेळके, शर्मिला ढवाण, मंगला किर्वे, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, विशाल जाधव, अविनाश बांदल, पत्रकार साधू बल्लाळ, तानाजी पाथरकर, अनिकेत कांबळे, मन्सूर शेख, अजिंक्य सातकर, अनिता गायकवाड, प्रा. आजिनाथ चौधर, पार्थ गालिंदे, ॲड शिवकांत वाघमोडे,विजया आल्लगी, सुलेखा होळकर, अश्विनी तावरे, शाळेचे मुख्याध्यापक नीलकंठ कापसे सर, सोनाबाई काळे आदी मान्यवर उपस्थित होते. अजितदादांच्या जयंतीनिमित्त आयोजित या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
*चौकट*१
-----------------------------
"विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविणे ही सामाजिक बांधिलकी
जपणारी बाब आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. अजितदादांच्याजयंतीनिमित्त सुरज देवकाते यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, समाजातील इतरांनीही अशा विधायक उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा,
*संभाजी होळकर*
(पुणे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )
---------------------------
*चौकट* :२
"विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविणे ही समाजाप्रती
असलेली बांधिलकी जपणारी बाब आहे. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांना निश्चितच
प्रोत्साहन मिळते. दिवंगत अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुरज देवकाते यांनी राबविलेला हा उपक्रम समाजातील इतरांसाठीही प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून समाधान वाटले"
*ॲड. किरण इंगळे*
(शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती )
No comments:
Post a Comment