नातवाची गोळी घालुन हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना केले अटक... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

नातवाची गोळी घालुन हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना केले अटक...

नातवाची गोळी घालुन हत्या करुन पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपींना केले अटक...
लोणावळा :- स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांची कारवाई दिनांक ०५/१०/२०२६ रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजि. नंबर ६७ /२०२६ बी.एन.एस.एस
१९४ प्रमाणे मयत दाखल झाले. त्याबाबत प्राथमिक प्राप्त माहिती मध्ये यातील मयत अभय मराठे हा त्याचे आजोबा मोतीराम मराठे यांचे नावावर असलेली परवाना धारक १२ बोअर रायफल साफ सफाई करीत असताना तिच्या मधुन गोळी सुटुन ती मयत अभय माणिक मराठे याचे छातीला मध्यभागी समोरच्या बाजुला लागुन तो मयत झाला आहे, सदरची माहिती प्राप्त होतानाच सदर घटणे बाबत संशय वाटला कि, मयत अभय मराठे हा जुनी साडचार फुट लांबीची १२ बोरची रायफल साफ करत असताना
त्यामधुन स्वतः कडे छातीत मध्येभागी फयार होणे शक्य नसल्याने व मिळालेली माहिती संशय वाटल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर यांनी ससुन हॉस्पिटल येथे जावुन भेट देवुन मयत बॉडी पाहिली असता जखम झालेल्या
ठिकाणी टॅटोइंग व स्मोकिंग झाल्याचे दिसुन आले नाही. सदरचा प्रकार संशयास्पद वाटत होता.
त्यामुळे सदर घटणेबाबत अधिक संशय वाढल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण,मा.अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन टोम्पे, लोणावळा विभाग,
स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर व स्थानिक गुन्हे शाखेकडील लोणावळा टिम मधील पोसई अभिजीत सावंत, संतोष शेळके, गणेश होळकर, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष भापकर, सिध्देश पाटील, अजय देडे, यांनी घटणास्थळी मौजे भुशी ता. मावळ जि.पुणे गावातील मोतीराम हॉटेल येथे जाऊन पाहणी केली असता हॉटेलमध्ये
काऊंटरजवळील भिंतीवर डाव्या बाजूस रक्ताचे थारोळे होते. सदर थारोळया काही अंतरावर काऊंटरमध्ये रक्ताचे दुसरे थारोळे दिसले व दरवाजा जवळील भिंतीवर ५ फुट उंचीवर रक्त उडालेले होते. सदरचे दोन रक्ताचे थारोळे आणि त्याचे अर्ध्याफुटाचे अंतरावर भिंतीवर उडालेले रक्त यावरून असा संशय आला की, कोणीतरी हॉटेलच्या हॉलमधून मयत इसमाचे छातीवर गोळी झाडली असावी त्यामुळे तेथील लोकांकडे व तेथे काम करणारा कामगार अनिकेत जयसिंग घुस्सर वय - ३४ वर्ष रा. घर नंबर ९५, रामनगर, लोणावळा ता. मावळ जि. पुणे मुळ राहणार- मेरठ उत्तर प्रदेश याचेकडे चौकशी केली असता त्याचेकडुन माहिती मिळाली कि, यातील मयत अभय मराठे व त्याचे आजोबा मोतीराम मराठे यांचे जागेच्या कारणावरुन काहि दिवसांपासुन
वाद सरु होते. व दिनांक ०५/१०/२०२६ रोजी सकाळी त्यांचेत वाद झाल्याने आरोपी मोतीराम रावजी मराठे याने त्यांचेकडील परवानाधारक १२ बोअर रायफल मधुन गोळी झाडून त्याचा नातु अभय माणिक मराठे याचा खुन केला आहे. तसेच मयत अभय मराठे याचे चुलते हिरामण मोतीराम मराठे, मयत याचा चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे वय ५० वर्षे व
हिरामण मराठे याची बहिण राजश्री दशरथ पवार वय ५८ वर्षे यांनी आपसात संगनमत करुन अभय मराठे याचा खुन लपवण्याचे व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज असलेला डिव्हीआर व कॅमेरे काढुन ते लपवुन ठेवून सदरच्या गुन्हयातील पुरावा नष्ट केला. त्याबाबत लोणावळा शहर पो स्टे गु.र.नं २२३ / २०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१),२३८,२४१,३(५) सह आर्म अॅक्ट ३, २७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी नामे १) मोतीराम रावजी
मराठे वय ८३ वर्षे, २) हिरामण मोतीराम मराठे वय ५४ वर्षे, ३) मनोज हिरामण मराठे वय ३२ वर्षे, ४) कविता हिरामण मराठे वय ५० वर्षे, ५) हिरामण मराठे याची बहिण राजश्री दशरथ पवार वय ५८ वर्षे सर्व राहणार- घर क. ४, तुळसा
निवास, भुशी, लोणावळा ता. मावळ जि. पुणे यांना अटक करण्यात आले आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ.शुभम कुमार, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गजानन टोम्पे, लोणावळा उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर, स्था. गुशा. चे पोसई अभिजीत सावंत, स्था. गु. शा. चे पोलीस अंमलदार संतोष शेळके, गणेश होळकर, सागर नामदास, गणेश धनवे, संतोष भापकर, सिध्देश पाटील, अजय देडे, यांनी केली असून
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. शंकर पाटील, वडगांव मावळ पोलीस स्टेशन हे करत आहे.

No comments:

Post a Comment