पोलीस आहे असे वाटले,मात्र निघाले सुरक्षा रक्षक वाहन चालकांकडून खंडणी घेतल्याने गुन्हा दाखल... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, October 1, 2026

पोलीस आहे असे वाटले,मात्र निघाले सुरक्षा रक्षक वाहन चालकांकडून खंडणी घेतल्याने गुन्हा दाखल...

पोलीस आहे असे वाटले,मात्र निघाले सुरक्षा रक्षक वाहन चालकांकडून खंडणी घेतल्याने गुन्हा दाखल...
लोणावळा :- लोणावळा शहरात येणा-या पर्यटकांकडुन खंडणी वसुल करणा-या महामार्ग सुरक्षा पोलीस खंडाळा दलाकडे कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या ३ कर्मचा-यांवर लोणावळा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत मिळालेली माहिती अशी की दि. ०१/१०/२०२६ रोजी सकाळी १०/३० वा चे सुमारास तक्रारदार विक्रमसिंह मोतीसिंह रघुवंशी वय ३३ वर्षे धंदा शिक्षक रा.कल्याण मुळ भोपाळ मध्यप्रदेश हे आपल्या पत्नीसह रॉयल इनफिल्ड बुलेट क.
२५बीएच ०३७३ एल वरून खंडाळा एक्झिट येथुन जात असताना महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी १)निलेश अशोक साळुंखे २) रोहीदास बदाम पाटील ३) राजेश सुर्यकांत केंद्रे यांनी त्यांना अडवुन तक्रारदार यांना तुम्ही फोर व्हिलरच्या मार्गाने टु व्हिलर चालवत आहात. येथे टु व्हिलरला बंदी आहे. अशी भिती घालुन
६०००/-रूपये दंड करून लायसन्स सस्पेंड करण्याची व गाडी जप्त करण्याची धमकी देवुन त्यानंतर तडजोड करून कारवाई न करण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांचेकडुन अमोल गणपत डोके यांचे ऑनलाईन क्युआर कोड वर १०००/- रूपये ऑनलाईन स्वरूपात खंडणी घेतली. तक्रारदारास शंका आल्याने त्यांनी स्थानिक नागरीकांकडे चौकशी केली असता सदर इसम पोलीस नसुन महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी असल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगितल्याने तक्रारदार यांनी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधुन
पोलीसांना माहीती दिली असता. सदरची माहीती मिळताच लोणावळा शहर पोलीस ठाणेचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन सदर आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदार यांचे तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस ठाणे गुरनं २१६/२०२६ भान्यासं कलम १२६ (२),३०८(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास श्री संदिपसिंह गिल सो पोलीस अधिक्षक पुणे
ग्रामीण, श्री शुभम कुमार सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, श्री गजानन टोम्पे सो उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा उपविभाग, श्री सचिन पाटील सो पोलीस निरीक्षक लोणावळा शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रविण लोकरे पोउप निरीक्षक लोणावळा शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
आवाहन:- लोणावळा व खंडाळा परीसरात येणा-या सर्व पर्यटकांना लोणावळा शहर पोलीस ठाणे कडुन आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस रस्त्यावर रोख रक्कम किंवा ऑनलाईन दंड देउ नये. असा कोणताही प्रकार घडल्यास तात्काळ ११२ क्रमांकावर किंवा लोणावळा शहर पोलीस ठाणेस संपर्क साधावा.
 
चौकट..
*अश्याच पद्धतीने काही भागात रस्त्यावर पोलीस असल्याचा भास करीत वाहने अडवून दंडाच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचे सांगितले जातंय, यामध्ये बहूतांश होमगार्ड, सुरक्षा रक्षक, खाजगी व्यक्ती जे अडली असतात हे सर्रास  पुणे जिल्हातील अनेक गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसतात, नंबर प्लेट बघून ही आपल्या भागातील नाही अश्या गाडीला बाजूला करून पावती दंड च्या नावाखाली पैसे घेत असल्याचे अनेक प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बोलून दाखविले, यावर वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.*

No comments:

Post a Comment