संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात समावेश करावा.:- डॉ. माकणीकर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 26, 2020

संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात समावेश करावा.:- डॉ. माकणीकर

संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात समावेश करावा.:- डॉ. माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) सर्व राज्यातील सरकारने भारतीय संविधान माध्यमिक शिक्षणात सक्तीने शिकवावे या मागणीसाठी मागील 14 वर्षांपासून प्रयत्नशील असून तत्कालीन सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.
मागील 14 वर्षांपासून सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या माध्यमातून संविधान जनजागृती व साक्षरता अभियान अंतर्गत डॉ माकणीकर यांनी 50 हजार भारतीय संविधान पुस्तिका लग्न समारंभ तर विविध कार्यक्रमाप्रसंगी वाटप केले, शिवाय 1 लाखाच्या वर संविधान उद्देशिका फ्रेम मोफत वितरित केल्या. 398 आजी माजी लोकप्रतिनिधींना समविधान पुस्तिका व निवेदने दिलीं आहेत.
संविधान जनजागृती अभियान व्यापक स्वरूपात आणण्यासाठी समविधान शिक्षण घेणे फार महत्वाचे असल्यामुळे 5 वि ते 10 च्या शालेय अभ्यासक्रमात हा विषय शिकवणीत घेण्यात यावा यासाठी सर्वांनी सरकारकडे आग्रह धरावा अशी विनंती अन्य राजकीय पक्षांना डॉ माकणीकर यांनी केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करून या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडू असा विश्वास दाखवला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या माध्यमातून आम्ही समविधान जनजागृती करून 26 नोव्हेम्बर संविधान दिवसाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा मिळवून देण्यासाठी व समविधान दिवस कसा साजरा करावा यासाठी एक आचारसंहिता निर्माण करावी यासाठी केंद्र सरकार कडे तगादा लावणार असल्याची प्रतिक्रिया डॉ माकणीकर यांनी दिली.
युवाध्यक्ष कनिष्क कांबळे, बौद्ध धम्मगुरु पूज्य भदंत शिलबोधी, कॅप्टन श्रावण गायकवाड राजेश पिल्ले व अन्य शिस्तमंडल याप्रकरणी महामहिम राष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याचे माहितीही डॉ माकणीकर यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment