किरकोळ कारणावरून पत्नीचा पतीकडून खून.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 10, 2020

किरकोळ कारणावरून पत्नीचा पतीकडून खून..

किरकोळ कारणावरून पत्नीचा पतीकडून खून..      पुणे(प्रतिनिधी):-पुणे येथील कोथरूड येथे किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा
पाठलाग करून भररस्त्यात चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोथरूड बस स्थानकाजवळ घडली आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून आरोपी फरार झाला आहे.कीर्ती रविकुमार पोटे (वय ४३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. रवी कुमार पोटे (वय ५०) असे असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे
दाम्पत्य डहाणूकर कॉलनीत मुलीसोबत राहतात.
आज दुपारच्या सुमारास नवरा-बायकोमध्ये
किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले.
त्यानंतर रागाच्या भरात कीर्ती कोथरूड बस स्थानक परिसरात आली होती, पती रवीकुमारने तिचा पाठलाग करून छातीत चाकू खुपसला. गंभीर जखमी झालेल्या कीर्तीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात
आले परंतु डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित
केले. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेतली फरारी आरोपीचा शोध चालू आहे .

No comments:

Post a Comment