बारामती मध्ये वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, एका मुलीची केली सुटका..
बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी
.
बारामती:- एमआयडीसीमधील एशियन पेंट्स या बंद पडलेल्या कंपनीच्या इमारतीमध्ये एक इसम महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाला मिळाली होती, त्याप्रमाणे बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून वेश्या व्यवसायास मुली पुरवणारा. दीपक अर्जुन नाळे, वय 45 वर्षे,डोरलेवाडी, तालुका बारामती, यास अटक केली असून एका 27 वर्षीय मुलीची सुटका केली आहे
सदरची कारवाई मा. मा.पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामिण श्री.अभिनव देशमुख साो,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, महिला पोलीस नाईक आशा शिरतोडे,पोलीस काॅस्टेबल नंदु जाधव,राहुल पांढरे,विजय वाघमोडे,मंगेश कांबळे,विनोद लोंखंडे,दत्तात्रय मदने, यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment