बारामतीत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत"मैं भी डिजिटल मोहीम सुरू.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

बारामतीत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत"मैं भी डिजिटल मोहीम सुरू..

*बारामतीत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत"मैं भी डिजिटल मोहीम सुरू*
                                                      बारामती-पथविक्रेत्यांना खेळते भांडवल मिळावे या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. बारामतीतील पथविक्रेत्यांना याची माहिती मिळावी यासाठी गणेश भाजी मंडई येथे  मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मैं भी डिजिटल मोहीम राबविल्यास पथविक्रेत्यांना त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम करण्यास मदत होईल व त्यांना डिजिटल साधनांची माहिती मिळेल याचे मार्गदर्शन बानप चे मुख्याधिकारी किराणराज यादव यांनी केले.गुगल पे,फोन पे, युपीआय या डिजिटल माध्यमातून पथविक्रेत्यांना व्यवहार करण्यास तसेच या मोहीमेबाबतची सर्व माहिती श्री.मुल्ला सर यांनी दिली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा,अटल पेंशन योजना,डिजिटल कर्जप्रक्रिया तसेच बँकिग ऑनलाईन व्यवहार यांची माहिती बँक आॅफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकांडून देण्यात आली. हा कार्यक्रम सुरू करताना हरित वसुंधरेची शपथ वैशाली अकिवाटे(क्षेत्रीय समन्वयक) महिला आर्थिक विकास महामंडळ,पथविक्रेते,कर्मचारी यांच्याकडून शपथेचे वाचन करण्यात आले.या मोहीमे बाबतची माहिती पथविक्रेत्यांना मिळावी व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.मुख्याधिकारी किराणराज यादव,श्री.भारत दत्तात्रय गायकवाड,बिंदू मॅडम (डेप्यूटी मॅनेजर),श्री.धुमाळ सर (अ.ज.मॅनेजर) बँक ऑफ महाराष्ट्र,श्री.मुल्ला सर,मोहन सुतार,दादा जोगदंड,राजू सोनवणे,बिराप्पा हाके,सलमा तांबोळी,कविता खरात उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांचे व उपस्थित पथविक्रेत्यांचे आभार वैशाली अकिवाटे मॅडम यांनी मानले व हा कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment