पिठाची गिरणी मालकाचा प्रामाणिकपणा... 45.500 रुपये केले परत.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 16, 2021

पिठाची गिरणी मालकाचा प्रामाणिकपणा... 45.500 रुपये केले परत..

पिठाची गिरणी मालकाचा प्रामाणिकपणा... 45.500 रुपये केले परत..                     बारामती:-बारामतीमध्ये कोरोना काळात अनेक घटना घडत असताना पोलीस यंत्रणेवरचा  ताण वाढतच चालला आहे अश्यात घडलेल्या घटनेचा शोध घेण्यासाठी दाखविलेली तत्परता खरेच वाखान्य जोगी आहे, एक तपास संपत नाही तोच दुसऱ्या तपासात व्यस्त असणाऱ्या पोलीस खात्यावरचा ताण काहीसा कमी झाला तो म्हणजे नुकताच एका कुटुंबातील 45.500 रुपये अचानक गायब झाले याबाबत तक्रार ..पुन्हा तपास.. पण असे झाले नाही,कारण अजूनही माणुसकी संपलेली नाही याबाबत हकीकत अशी की, सौ रेखा राजेंद्र जगताप रा. भैय्यावस्ती मळद यांच्या मालकीची पिठाची गिरण आहे या गिरणीमध्ये दळण दळणेसाठी याच गावातील मनोज किसनराव शेंडे यांच्या पत्नीने नजर चुकीने दळण दळण्याच्या डब्यात 45.500 रुपये ठेवले होते ते तसेच दळण दळण्यासाठी दिले आणि निघून गेले ज्यावेळी हा डबा दळण्यासाठी घेतला असता सौ रेखा जगताप यांच्या लक्षात आले त्यांनी ही बाब त्यांचे पती यांना सांगितले व दोन दिवस वाट पाहिली की हे कुणाचे पैसे आहेत ते विचारणा करतील पण असे न झाल्याने अखेर बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना सांगितले यावेळी ही रक्कम मनोज किसनराव शेंडे यांची असल्याचे समजले वरून त्यांचे भाऊ युवराज किसनराव शेंडे ग्रामपंचायत सदस्य व सहा.फोजदार चांदगुडे यांच्याकडे  बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व पोलीस स्टाफ सह ही रक्कम  देण्यात आली ,आजच्या युगात प्रामाणिकपण दाखविल्या बद्दल पोलीस खात्यामार्फत जगताप कुटुंबाचे कौतुक व सन्मान करण्यात आला अशी माहिती पोलीस कर्मचारी दादासाहेब डोईफोडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment