मंगलदास निकाळजे यांची वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा महासचिव पदी निवड
बारामती:-दि.9.2.2021 रोजी बारामती शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कार्यकारणी निवड आणि मुलाखती घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यामध्ये तालुक्यातील बऱ्याच युवकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध पदासाठी अर्ज सादर केले होते त्यावेळी मंगलदास भाऊ निकाळजे यांनी देखील महासचिव पदासाठी मुलाखत देत अर्ज केला होता त्याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाड़ी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व पुणे जिल्हा अध्यक्ष विनोदजी भालेराव यांच्या मार्गदर्शना खाली पुणे ज़िल्हा पूर्व भागातील ज़िल्हा कार्यकारानीच्या नियुक्त काल करण्यात आल्या त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तसेच ब्ल्यु पँथर चे संस्थापक अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांची वंचित बहुजन आघाडीच्या पुणे जिल्हा महासचिव पदी निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर मंगलदास निकाळजे यांनी कामाला सुरवात करत बारामती तालुक्यामध्ये मोठ्या जोमाने काम करण्याचे कार्यकर्त्यांना आव्हान केले तसेच वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा तसेच शहर, तालुक्यात लवकरच शाखा उघडणार असल्याचे सांगितले
No comments:
Post a Comment