*पंचशील चौक ते बारामती चौक रस्याच्या कामाचे उदघाटन - नगरसेविका वैशाली सुधिर अहिवळे*
फलटण :-शहरातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मार्ग म्हणजे बारामती चौक ते पंचशिल चौक हा वर्दळीचा मार्ग असल्याने या रस्याच्या कामाच्या दुरुस्तीची मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत होते. अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. दलित फंडातून निधी उपलब्ध होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते. अनेक प्रयत्न केले असता तो निधी मंजूर झाला.
फलटण शहरातील बारामती चौक ते पंचशिल चौक परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. या कामाचे उद्घाटन नगरसेविका वैशाली सुधिर अहिवळे, नगरसेवक सनी सजंय अहिवळे, चेअरमन सुधिर अहिवळे, सचिन भोसले यांच्या हस्ते पार पडला.
No comments:
Post a Comment