उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात भूखंडासाठी उद्योगमंत्र्यांच्या नावे बनावट शिफारस पत्र तयार करून सरकारची फसवणूक!युवकाविरोधात गुन्हा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, March 5, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात भूखंडासाठी उद्योगमंत्र्यांच्या नावे बनावट शिफारस पत्र तयार करून सरकारची फसवणूक!युवकाविरोधात गुन्हा...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात भूखंडासाठी उद्योगमंत्र्यांच्या नावे बनावट शिफारस पत्र तयार करून सरकारची फसवणूक!युवकाविरोधात गुन्हा...                                                                               बारामती(प्रतिनिधी):-बारामती चे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पोलीस खात्याला चांगलेच धारेवर धरले होते, त्यामुळे बड्या सावकारावर कारवाई करण्यात आली त्याच अनुशंगाने चुकीचे काम करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याला सोडू नका अश्या पद्धतीने सूचना देण्यात आल्या होत्या अशीच एक धक्कादायक घटना घडली  बारामती औद्योगिक वसाहतीमधील भूखंड स्वत:च्या मालकीचा व्हावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नावाचे बनावट शिफारस पत्र तयार करत चक्क सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी येथील सोहेल गुलमोहमंद शेख बागवान (रा. साहिल बंगला ,बारामती क्लब रोड, बारामती) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलिमफकिर महंमद बागवान (वय 55, रा. कचेरी रोड, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. गतवर्ी हा प्रकार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोहेल शेख यांच्या सासर्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला.
सोहेल व त्याच्या सासरच्यात वाद मिटविण्यासाठी फिर्यादी सलिमफकिर यांनी पुढाकार घेतला होता.यासाठी सोहेल याने फि्यादीची भेट घेतली असता सासर्यानी दिलेले पत्र फिर्यादीने सोहेल याला दाखविले. त्याने मूळ पत्र सादर करत उद्योगमंत्र्यांनी बारामती एमआयडीसीतील भूखंड माझ्या नावे
होण्याची शिफारस केली असल्याचे सांगितले.सासर्यानी सरकारी रक्कम न भरल्याने माझी शिफारस झाल्याचे तो म्हणाले. या पत्राविषयी फिर्यादीने अधिक माहिती घेतली असता त्यावर 28 जून 2019 अशी तारीख असल्याचे दिसून आले.फिर्यादीने बारामती
कार्यालयाकडे माहिती मागितली. परंतु त्यांच्याकडे असे कोणतेही पत्र नसल्याचे दिसून आले. फिर्यादीने माहिती अधिकारात उद्योग व खणीकर्म मंत्रालयाकडे माहिती मागवली. त्यावेळी असे कोणतेही पत्र देसाई
यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय यासंबंधी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्याला बनावट पत्रासंबंधी माहिती देण्यात आली.हा प्रकार बारामतीत घडल्याने बारामतीत तक्रार देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार फिर्याद देण्यात आली. सोहेल वसाहतीमधील कटफळ येथील प्लॉट क्र. जी- 35 हा स्वतःच्या नावे होण्यासाठी उद्योगमंत्र्यांचे बनावट शिफारस पत्र तयार केले. हा खोटा दस्तावेज स्वतःजवळ बाळगून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास चालू आहे.

No comments:

Post a Comment