अजितदादा बारामतीतील अशी अवस्था कधी थांबेल..नागरिक फोडतायेत टाहो.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 10, 2021

अजितदादा बारामतीतील अशी अवस्था कधी थांबेल..नागरिक फोडतायेत टाहो..

अजितदादा बारामतीतील अशी अवस्था कधी थांबेल..नागरिक फोडतायेत टाहो..               

बारामती:-बारामती विधानसभा व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मतदार संघात जेव्हा रुग्ण संख्या वाढत असताना  मृत्यूचे तांडव देखील  पाहायला मिळत आहे, गेल्या वर्षी देखील बारामतीत कोरोनाने मृत्यू झालेली आकडेवारी पाह्यलॆ परंतु यावर्षीच्या कोरोना मृत्यूच्या आकडे पाहता साऱ्यांना हादरून सोडले आहे. कालपासून आज सकाळपर्यंत तब्बल 12 जण बारामतीत हे जग सोडून गेले आहेत. यापैकी
काहींना रेमेडीरिसिवर रेमेडिसिव्हीर इंजेक्शन वेळेत मिळाले नाही, काहींना व्हेंटिलेटर वेळेवर मिळाला नाही, तर काही जण अत्यवस्थ होते, घेत आहेत. अनेक रुग्ण उशिरा दाखल झाल्याने त्यांना ऐनवेळच्या उपचारांमध्ये नातेवाईकांना
अत्यंत धावपळ करावी लागत आहे. बारामतीत
काल एचआरसीटी स्कोअर 20 असलेल्या एका
रुग्णास इंजेक्शन उपलब्ध झाले नाही, तसेच
व्हेंटिलेटरची आवश्यकता असतानाही व्हेंटीलेटर
बेडही वेळेवर मिळाला नाही, त्यामुळे त्याला हे जग सोडून जावे लागले. बारामती मध्ये कोणत्याही हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थ
किंवा गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेली
उपचार सुविधा आजमितीस नाही. कारण व्हेंटिलेटरची रेमीडीसीव्हरच्या उपलब्धता
आता नाही.इंजेक्शनचा खाजगी हॉस्पिटलमध्ये तुटवडा आहे. लोक या इंजेक्शनसाठी अक्षरशः गयावया करत दिवसभर माहिती मिळेल तिथे फोन करत आहेत.पुढारी, नेतेमंडळी, मित्रपरिवार यांचा वशिला घेऊनही इंजेक्शन मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मतदार संघात ही अवस्था असेल तर इतर ठिकाणी काय अवस्था असेल अशी चर्चा चालू झाली आहे

No comments:

Post a Comment