बहुजन महापुरुष विचार संघ तर्फे आंबेडकर जयंती निमित्त सांगवीत रक्तदान शिबीर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 14, 2021

बहुजन महापुरुष विचार संघ तर्फे आंबेडकर जयंती निमित्त सांगवीत रक्तदान शिबीर

बहुजन महापुरुष विचार संघ तर्फे आंबेडकर जयंती निमित्त सांगवीत रक्तदान शिबीर

बारामती दि.१४ :  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती महोत्सवा निमित्त "रक्तदान करुनी,महामानवांना अभिवादन करूया" या अभियाना अंतर्गत बुधवार दि.१४ एप्रिल रोजी बारामती तालुक्यातील सांगवी येथील मिलिंद नगर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त बहुजन महापुरुष विचार संघ वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
ज्या महामानवांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी खर्ची केले.त्या महामानवांच्या कार्यापासूनच प्रेरणा घेऊन.कोविड-१९ सारख्या महाभयंकर आजाराच्या संकटातून महाराष्ट्र जात असताना.राज्यात रक्ताचा तुटवडा पडत असताना.बारामती तालुक्यातील समाज बांधवानी रक्तदान करून खऱ्या अर्थाने मानव कल्याणाचे काम करून या महामानवांना अभिवादन केले आहे.दिवसभर सुरु असलेल्या या रक्तदान शिबिराचे या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment