जळोची गावातील कोरोना कालावधीत लोकप्रतिनिधी दाखवा आणी रोख रक्कम 1000 रू मिळवा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

जळोची गावातील कोरोना कालावधीत लोकप्रतिनिधी दाखवा आणी रोख रक्कम 1000 रू मिळवा

*जळोची गावातील कोरोना कालावधीत लोकप्रतिनिधी दाखवा आणी रोख रक्कम 1000 रू मिळवा*
बारामती:-जळोची परिसरात गेल्या एक वर्षांपासून देश्यावरती खुप मोठ कोरोना चे सावट आलेले आहे प्रत्येक ठीकाणी जो तो लोकप्रतिनिधी काम करताना दिसतोय परंतु जळोची भागात एखादा वगळता बाकी लोकप्रतिनिधी यांचे दर्शन दुर्मीळच झाले आहे, अगदी गावात येतच नाही असे  म्हटले तरी चालेल, गावातील कोणा कोणाच्या काय काय अडचणी आहेत, कोणाला बेड मिळत नाही कोणाला औषध नाही,गेल्या कित्येक दिवसा पासुन जळोची प्राथमिक शाळेत कोव्हीड सेंटर करा ही मागणी आहे,  लसीकरण केंद्र चालु करा ही मागणी आहे, तसेच गावात औषध फवारणी करा ही मागणी आहे, परंतु लोकप्रतिनिधी साधे बोलायला तयार नाहीत, गावाचा Whats app ग्रुप आहे तीथे लोकप्रतिनिधी गावाच्या या विषयावर बोलायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधी  स्वतःचे अर्थ कारण करण्यात,वाढदिवसाचे मेसेज करण्यात व्यस्त आहेत, अशा पध्दतीने लोक प्रतिनिधी कडून काम होत आहे याची लवकरात लवकर, उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या कडे तक्रार करणार आहोत, सुप्रसिद्ध मॅरेथॉन पट्टु यांचे पती भगवान करे हे हॉस्पीटल मधुन उपचार घेत असताना निघुन आले, दोन दिवस जळोची गावातील चिंचे च्या झाडा खाली पडून होते, तरी देखील लोकप्रतिनिधी यांचे गावाकडे लक्ष नाही, उपमुख्यमंञी अजित पवार यांनी या कडे लक्ष घालावे अशी मागणी, राष्ट्रीय समाज पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी केली

No comments:

Post a Comment