*बेस्ट अॅक्टविस्ट ऑफ द मंथ , सुनिल गुजर , मावळ , पुणे*
प्रतिनिधी भालचंद्र महाडिक
श्री.सुनिल अण्णा गुजर राहणार पिंपळोली पो.कामशेत ता.मावळ जि.पुणे . हे एक अफलातून व्यक्तीमत्व आहे . मूळ व्यवसाय आहे शेती . पण स्वभावाचा पिंड समाजसेवा आहे . आणि आता त्या समाजसेवेच्या धडपडणाऱ्या गाडीला माहिती अधिकाराचे डबल इंजिन जोडलेले आहे.त्यामुळे कामाला भरपूर वेग आलेला आहे . कोणीही अडलेला भेटू दे ! कोणीही संकटातला दिसू दे , सुनिल गुजर त्यांची विचारपूस करणारं आणि जेवढं शक्य आहे तेवढी मदत करण्यास एकापायावर तत्पर असतात . कोठेही कोणावर अन्याय झाला . कोठेही कोणांची फसवणूक झाली . कोठेही कोणांचं शोषण झालं की सुनिल गुजर हे त्यांची लेखणीघेऊन प्रशासनांकडे दाद मागायला सर्वांत पुढे असतात . शिवस्वराज्यांचे सर सेनापती प्रतापराव गुजर यांचा जैविक व वैचारिक वारसा सांगण्यात सुनिल अण्णा गुजर यांचा ऊर भरून येतो.कारण लढणं हा वारसा त्यांना प्रतापराव गुजर यांच्याकडून मिळालेला आहे . आपण प्रतापराव गुजराबद्दल ते गाणं ही ऐकलेलं आहे . वेडात दौडले वीर मराठा सात ! काही दिवसांनी त्या गाण्यांत आपल्याला वेडात दौडले वीर मराठा आठ ! अशी दुरूस्ती करून घ्यावी लागेल कारण , पण सुनील गुजर हे सुद्धा वेडात दौडणारे आठवे वीर आहेत.सरसेनापती प्रतापराव गुजर प्रतिष्ठान या नावाने सुनिल गुजर हे संस्थाचालवितात . रोज सकाळी उठायंच.वृत्ती अध्यात्मिक असल्याने शुद्ध अंतकरणांन तयार व्हायचं . तो पर्यंत अनेकजण अनेक कामं घेऊन सुनिल गुजर यांना संपर्क करीत असतात . कोणाला तलाठी सात - बारा देत नाही . कोणाला ग्रामसेवक रहिवाशी दाखला देत नाही . कोणाला जमिन मोजणी अधिकरी दाद देत नाही . कोणाची तक्रार पोलिस ऐकूण घेत नाहीत . कोणाला रेशन दुकानदार धान्य देत नाही . तहसीलदार कोणाचा पंचनामा करीत नाहीत.अशा अनेक कामांची जंत्री घेऊन पुणे , तळेगांव , लोणावळा अशा पूर्ण मावळ खोऱ्यांतल्या सरकारी कार्यालयात धडका देत कसलाही लोभ व आशा व अपेक्षा न ठेवता जनतेची काम करीत रहायची हा सुनिल गुजर यांचा दिनक्रम असतो . साधी राहणी व उच्च विचार . वेष असावा बावळा पण अंगी नाना कळा . ही तुकोबांची उक्ती सुनिल गुजर यांना तंतोतंत लागू पडते.माणूस साधा आहे.पण कायदे कानून यांची जाण सखोल आहे . माहिती अधिकारांचा सुक्ष्म अभ्यास आहे . व अंगी शंभर टक्के प्रामाणिकपणा आहे.बेलगाम सरकारी अधिकारी यांना कसा लगाम घालायचा याचे उत्तम कौशल्य आहे.तसेच वयाच्या पन्नाशीमध्ये ही तारुण्यातील सळसळ कायम आहे . अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते हे इतरांना टोप्या घालण्यात पटाईत असल्याचे आपण नेहमी पाहतो . पण सुनिल गुजर हे स्वत : ला टोपी घालून घेणारे आमच्या माहिती अधिकार महासंघातील एकमेंक कार्यकर्ता आहेत . अशा या अफलातून कार्यकर्त्यांला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मे २०२१ मध्ये द बेस्ट अॅक्टीविस्ट ऑफ द मंथ या सन्मानाने पुरस्कार देण्यात येत आहे . त्यांना एक ट्राफी व एक छान प्रमाणपत्र देऊन त्यांचा लवकरच सन्मान केला जाईल . कार्यकर्ता कसा असावा . कार्यकर्त्यांनी कसे काम करावे यांचा सुनिल गुजर एक उत्तम आदर्श आहेत .
No comments:
Post a Comment