शंभुजयंती निमित्त किल्ले धर्मवीरगडावर शौर्यस्थळाचें पूजन करुन गरजूंना किराणा वाटप अहमदनगर:- दि.१४ मे रोजी छत्रपती शंभुराजांच्या जयंती निमित्त शंभुसेनाच्या वतीने किल्ले धर्मवीरगडावरील शौर्यस्थळाचे पुजन करण्यात आले. यावेळी धर्मवीरगडाच्या गडपालांसह अन्य गरजूंना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. या मदत कार्यासाठी शंभुसेना पदाधिकारी विशेष योगदान लाभले. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमुळे यावर्षी मोजक्याच शंभुभक्तांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करत गडावरील शंभुराजांच्या शौर्यस्थळाचे पूजन शंभुसेना प्रमुख मा.श्री.दिपक राजेशिर्के यांच्या हस्ते करण्यात आले व छत्रपती शंभुराजांचा जयघोष करण्यात आला. यावेळी शंभुसेना सोशियल मीडिया प्रमुख प्रकाश म्हस्के , लक्ष्मीकांत राजेशिर्के , प्रा.शिवाजी क्षिरसागर , ह.भ.प.परशुराम खळदकर , गडपाल भाऊसाहेब घोडके , गडपाल नंदकुमार क्षिरसागर , गडसेवक मच्छिंद्र पंडित , शंभुसेना प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य सचिन हाडोळे पाटील , शंभुसेना प्रदेश संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य श्याम देशकर , शंभुसेना जिल्हाध्यक्ष बीड विठ्ठल होनमाने , शंभुसेना धुळे जिल्हाध्यक्ष विलास केसरे , शंभुसेना तालुका संपर्क प्रमुख नगर हर्षद विनायक शिर्के पाटील , शंभुसेना तालुकाध्यक्ष नगर स्वप्निल निमसे , शंभुसेना कामगार तालुकाध्यक्ष नगर अनिल निमसे आदीसह शंभुभक्त उपस्थित होते
Post Top Ad
Friday, May 14, 2021
Home
अहमदनगर
ताज्या घडामोडी
शंभुजयंती निमित्त किल्ले धर्मवीरगडावर शौर्यस्थळाचें पूजन करुन गरजूंना किराणा वाटप
शंभुजयंती निमित्त किल्ले धर्मवीरगडावर शौर्यस्थळाचें पूजन करुन गरजूंना किराणा वाटप
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment