राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून तहसिल कार्यालयात अभिवादन
बारामती दि.26:- छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त तहसिल कार्यालय, बारामती येथे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
तहसिल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, संजय गांधी योजना नायब तहसिलदार महादेव भोसले, निवडणूक नायब तहसिलदार पी. डी. शिंदे, उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार भक्ती सरवदे तसेच तहसिल व उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment